गडचिरोली : पुन्हा एका जहाल नक्षलीस केली अटक

1584

– सहा लाखांचे बक्षीस होते जाहीर
The गडविश्व
गडचिरोली, १७ ऑक्टोबर : नक्षल्यांच्या माड सप्लाय टीममध्ये एसीएम पदावर असेलेल्या जहाल नक्षलीस पोलीस आणि सिआरपीएफ दलाने संयुक्त कार्यवाही करत १७ ऑक्टोबर रोजी अटक केली आहे. मेस्सो गिल्लू कवडो (५०) , रा. रेखाभटाळ तह. एटापल्ली जि. गडचिरोली असे अटक करण्यात आलेल्या नक्षलीचे नाव आहे. त्यावर शासनातर्फे सहा लाखांचे बक्षीस जाहीर होते. तो १४ ऑक्टोबर रोजी अटक केलेल्या जहाल नक्षली डीव्हीसी चैतुराम ऊर्फ सुक्कू वत्ते कोरसा याच्या सोबत काम करत होता. या दोघांना चार दिवसांत अटक केल्याने नक्षल्यांच्या पुरवठा साखळीला मोठा धक्का बसला आहे.
जाजावंडी – दोड्डुर जंगल परिसरात वास्तव्यास असल्याच्या मिळालेल्या गोपनिय माहितीवरुन विशेष अभियान पथक, पोस्टे गट्टा (जां) पोलिस पार्टी व सिआरपीएफ १९१ बटालियनच्या जवानांनी नक्षलविरोधी अभियान राबवून त्यास अटक केली. त्यास सन २०२३ च्या हिक्केर जंगल परिसरात झालेल्या पोलीस नक्षल चकमकीवरुन पोस्टे एटापल्ली जि. गडचिरोली येथे दाखल अप. क्र. 0013/2023 कलम 307, 353, 143, 148, 149, 120 (ब) भादवी, 3/25, 5/27 भारतीय हत्यार कायदा, 3, 4 भारतीय स्फोटक कायदा, 135 महाराष्ट्र पोलीस कायदा व 13, 16, 18 (अ) युएपीए ॲक्ट अन्वये गुन्ह्यात अटक करण्यात आलेली आहे.

अटकेतील मेस्सो गिल्लू कवडो याचा दलममधील कार्यकाळ

– २०१७ च्या आधी माओवाद्यांना जीवनावश्यक सामान आणून देणे, पोलीस पार्टी आल्याचे निरोप देणे इ. काम करत होता.
– २०१७ ला सप्लाय टीम/स्टाफ टीममध्ये सदस्य या पदावर भरती होऊन सन २०२३ पर्यंत कार्यरत.
– २०२३ मध्ये एसीएम पदावर पदोन्नती होऊन आजपर्यंत कार्यरत.

कार्यकाळात केलेले गुन्हे

दोन चकमक, दोन खून व एक जाळपोळ

– नोव्हे./डिसेंबर २०१७ मध्ये मुस्फर्शी जंगल परिसरातील चकमकीमध्ये सहभाग.
-मार्च २०२३ मध्ये मौजा मौजा हिक्केर (म.रा.) जंगल परिसरातील चकमकीमध्ये सहभाग.
– २०२१-२२ मध्ये मध्ये रामनटोला तह. एटापल्ली जि. गडचिरोली येथे झालेल्या गाव पाटलाच्या खुनात प्रत्यक्षरित्या सहभाग.
– २०२२ मध्ये पुन्हा दोड्डुर तह. एटापल्ली जि. गडचिरोली येथे झालेल्या गाव पाटलाच्या खुनात प्रत्यक्षरित्या सहभाग.
– २०२१ मध्ये ताडबैली, जि. कांकेर (छ.ग.) येथील मोबाईल टॉवर जाळपोळ करण्यात त्याचा सहभाग होता.

गडचिरोली पोलीस दलाच्या प्रभावी कारवाईमुळे माहे जानेवारी २०२२ ते आतापर्यंत एकुण ७२ माओवाद्यांना अटक करण्यात गडचिरोली पोलीस दलास यश आलेले आहे . सदरची कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल सा., अपर पोलीस अधीक्षक (अभियान) अनुज तारे सा, मा. अपर पोलीस पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता सा. मा अपर पोलीस अधीक्षक, अहेरी यतिश देशमुख सा. यांचे मार्गदर्शनाखाली व उपविभागीय पोलीस अधिकारी, हेडरी बापूराव दडस आणि सीआरपीएफ ई/191 बटालीयनचे असिंस्टंट कमांडन्ट मोहीत कुमार यांचे नेतृत्वात पार पडली. यावेळी पोलीस अधीक्षक यांनी माओवाद्यांना माओवादाची हिंसक वाट सोडुन आत्मसमर्पण करुन सन्मानाने जीवन जगण्याचे आवाहन केले आहे .

(The GDV, The Gadvishva, Gadchiroli News Updates, Gadchiroli Police, Naxal Arrest)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here