– तालुकानिहाय खतसाठ्याची माहिती, केंद्र चालकांचे संपर्क व खतांचे प्रकार एका क्लिकवर उपलब्ध
The गडविश्व
गडचिरोली, दि. २३ : गडचिरोली जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने शेतकऱ्यांसाठी एक अभिनव आणि सुलभ डिजिटल सेवा सुरू केली असून, आता रासायनिक खतांची माहिती घरबसल्या मिळणार आहे. Blogspot या सुलभ आणि लोकप्रिय माध्यमाच्या सहाय्याने “खते माहिती प्रणाली” सुरू करण्यात आली असून, त्याची माहिती जिल्हा कृषी विकास अधिकारी श्रीमती किरण खोमणे यांनी दिली.
खरीप आणि रब्बी हंगामात खतांची तुटवडा किंवा वेळेवर माहिती न मिळाल्यामुळे अनेकदा शेतकऱ्यांना केंद्राच्या फेऱ्या माराव्या लागत होत्या. आता मात्र https://adozpgadchiroli.blogspot.com/2025/07/blog-post.html या लिंकवर क्लिक करून शेतकरी त्यांच्या तालुक्यातील कृषि सेवा केंद्रांमध्ये उपलब्ध असलेल्या रासायनिक खतांचा साठा, खतांचे प्रकार, केंद्र चालकांचा मोबाईल क्रमांक आदी माहिती सहज पाहू शकतात.
ही माहिती तालुकानिहाय, केंद्रनिहाय पद्धतीने सादर केली असून ती दररोज अद्ययावत केली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या गरजेनुसार योग्य केंद्राची निवड करून खत खरेदीचे अचूक नियोजन करता येते. हे डिजिटल साधन कोणत्याही स्मार्टफोनवर मोफत वापरता येते आणि यासाठी कोणतेही अॅप डाऊनलोड करण्याची आवश्यकता नाही.
“डिजिटल यंत्रणांचा प्रभावी वापर करून आम्ही शेतकऱ्यांपर्यंत अचूक आणि वेळेवर माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांचा वेळ, पैसा आणि श्रम वाचणार आहेत,” असे मत श्रीमती किरण खोमणे यांनी व्यक्त केले.
हा ब्लॉग म्हणजे पारदर्शक व सार्वजनिक माहितीचा एक नवा दुवा ठरत असून, गडचिरोलीसारख्या दुर्गम भागातही डिजिटल शेती सेवा शक्य असल्याचे उत्तम उदाहरण ठरत आहे. कृषी विभागाचा हा उपक्रम शेतकऱ्यांच्या हितासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे.
#thegdv #gadchirolipolice #gadchirolinews #gadchirolinews #Gadchiroli #FarmingInnovation #FertilizerInfo #DigitalAgriculture #SmartFarming #AgriTech #FertilizerAvailability #KrishiVibhag #BlogspotInitiative #FarmersWelfare #GadchiroliAgriculture #FertilizerUpdate #AgriBlog #DistrictAgricultureOffice #TransparentFarming
#गडचिरोली #शेतकरी #कृषिविभाग #खतेमाहितीप्रणाली #डिजिटलशेती #Blogspot #खतेउपलब्धता #AgricultureTech #SmartFarming #गडचिरोलीअभिनवउपक्रम #खतेब्लॉग #DistrictAgricultureOffice #GadchiroliFarming #कृषी_परिषदेचा_उपक्रम
