The गडविश्व
गडचिरोली, दि. १६ : जिल्ह्यातील गोदावरी नदीच्या त्रिवेणी संगमावर अंघोळीला गेलेल्या युवक बुडाल्याची घटना १६ जून रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली. गरिकापाटी अखिल ( वय १९) रा. वारंगल, असे नदीत बुडालेल्या युवकाचे नाव आहे.
महाराष्ट्र – तेलंगणा राज्याच्या सीमेवरील कालेश्वरम शहरानजीकच्या गोदावरी नदीच्या त्रिवेणी संगमावर पवित्र स्नानासाठी गरिकापाटी अखिल हा पत्नी व अन्य सदस्यांसह कालेश्वरम तीर्थक्षेत्रात दर्शन घेण्यासाठी आला होता. दरम्यान मंदिरात पूजाअर्चा करण्यापूर्वी पवित्र स्नान करण्यासाठी तो गोदावरी नदी पात्रात उतरला. नदीमध्ये स्नान करत असताना तो खोलवर पाण्यात बुडाला व बेपत्ता झाला. सायंकाळपर्यंत तो मिळून आला नाही अशी माहिती आहे. घटनेची माहिती कालेश्वरम पोलिसांना देण्यात असता पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. बेपत्ता युवकाची शोधमोहीम सुरू असून तो पाण्याचा प्रवाह सुरू असल्याने वाहत गेला असावा असा तर्क लावण्यात येत आहे.
![](https://www.thegdv.com/wp-content/uploads/ADD111-scaled.jpg)
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #trivenisangam)