– एकजण जखमी
The गडविश्व
गडचिरोली, दि. १२ : लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रकने दुचाकीला धडक देऊन झालेल्या अपघातात महिला जागीच ठार तर एकजण जखमी झाल्याची घटना रविवार ११ ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास गडचिरोली नजीकच्या वाकडी फाट्याजवळ घडली. कुंदाबाई जनार्धन आखाडे (वय ७० ) रा. कुनघाडा रै, ता. चामोर्शी असे अपघातात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे तर जनार्दन आखाडे (वय ७३) हे किरकोळ जखमी आहेत.
काही कामानिमित्त कुनघाडा येथून आखाडे दाम्पत्य हे गडचिरोली येथे दुचाकीने येत होते. दरम्यान वाकडी फाट्याजवळ दुचाकी घसरल्याने कुंदाबाई या रस्त्यावर पडल्या. याचवेळी त्यांच्या मागून लोहखनिज भरून लोहखनिज येत असलेला ट्रक कुंदाबाई यांच्या अंगावरून गेल्याने त्या जागीच ठार झाल्या. जनार्दन आखाडे यांच्या हातापायाला आणि डोक्याला किरकोळ मार लागला आहे. त्यांच्यावर रुग्णालयात दवाखान्यात उपचार सुरू आहे. अपघात एवढा भीषण होता की ट्रक अंगावरून गेल्याने शरीर पूर्णतः छिन्नविछिन्न झाले होते.
अपघात होताच ट्रकचालक घटनास्थळावरून पसार झाल्याची माहिती आहे. गडचिरोली पोलिसांनी ट्रक ताब्यात घेत ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolipolice #gadchirolilocalnews #accident #truck accident)