गडचिरोली : चारचाकी वाहनासह ९ लाखांचा मुद्देमाल जप्त

1076

The गडविश्व
गडचिरोली, दि. २४ : जिल्हयात दारुबंदी असतांना अवैधरीत्या छुप्या रीतीने दारु विक्री व वाहतुक केली जाते. त्याविरुध्द पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांचे अवैध दारु विक्री करणा­ऱ्यावर अंकुश लावण्याबाबत मिळालेल्या आदेशान्वये काल २३ मे रोजी मिळालेल्या माहितीनुसार सापळा कारवाईत चारचाकी वाहन व अवैध दारू असा ९ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी गोपाल पोयडवार, रा. पारडी तह. लाखांदूर जि. भंडारा व अंजय्या पुल्लुरवार, रा. पेठवार्ड, ब्राम्हपूरी जि. चंद्रपूर याविरुध्द आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
गोपनिय माहितीवरुन स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी पोनि. उल्हास भुसारी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक आष्टी येथे रवाना करण्यात आले. पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार हे कंसोबा मार्कंडा फाटा, आष्टी येथील फॉरेस्ट नाक्याजवळ २३ मे रोजी दुपारी १२ ते ३.३० वाजताच्या दरम्यान सापळा रचुन उभे असतांना संशयीत चारचाकी वाहन हे भरधाव वेगाने कंसोबा मार्कंडा फाटा येथील फॉरेस्ट नाक्याजवळ पोहचताच पोलीसांनी आपल्या वाहनाने तात्पुरता अडथडा निर्माण केला असता वाहन चालकाने वाहन वळवुन पळुन जाण्याचा प्रयत्न केला. परंतु स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने फॉरेस्ट नाका खाली घेऊन पळुन जाणा­ऱ्या वाहनास मोठ्या शिताफिने अडविले. वाहनाची तपासणी केली असता त्यात अवैधरीत्या देशी दारूच्या ५० पेट्या आढळून आल्या. पोलिसांनी दारूचा मुद्देमाल व चारचाकी वाहन जप्त करून या प्रकरणी दोघांवर गुन्हा दखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख , अपर पोलीस अधीक्षक अहेरी एम. रमेश सा. व स्थानिक गुन्हे शाखा, गडचिरोलीचे पोलीस निरीक्षक उल्हास भुसारी यांचे मार्गदर्शनाखाली स.पो.नि. राहुल आव्हाड, पोहवा दिपक लेनगुरे, अकबर पोयाम, पोअं श्रीकृष्ण परचाके, श्रीकांत बोईना व चापोअं विनोद चापले यांनी केलेली आहे.

(#thegdv #thegadvishva #gadchirolipolice #ashtipolice #crimenews )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here