गडचिरोली येथे अनुसूचित जाती प्रवर्गातील उद्योजकाकरीता निशुल्क निवासी प्रशिक्षण

88

The गडविश्व
गडचिरोली, दि.३१ : गडचिरोली जिल्ह्यातील अनुसूचित जातीच्या (SC) उद्योजकांकरीता भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर विशेष सामुहिक प्रोत्साहन योजनेअंतर्गत निवासी उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. १८ दिवस कालावधीच्या या कार्यक्रमात विविध उद्योगसंधी, व्यक्तीमत्व विकास, शासकीय योजनांची माहिती, प्रकल्प अहवाल तयार करणे, हिशेब ठेवणे, उद्योगाचे व्यवस्थापन, कर्जप्रकरण तयार करणे, यशस्वी उद्योजकांची चर्चा, उद्योगांना भेटी इत्यादी विषयांवर तज्ज्ञ व अधिकारी वर्गाद्वारे मार्गदर्शन करण्यात येईल. प्रशिक्षण हा निशुल्क व निवासी स्वरुपाचा आहे.
१८ ते ४० वयोगटातील १० वी पास/नापास अनुसूचित जातीचे प्रशिक्षणार्थी यामध्ये भाग घेऊ शकतात. उद्योग व्यवसाय करण्याची तीव्र इच्छाशक्ती व याआधी कर्ज न घेतलेले उमेदवार यामध्ये भाग घेवु शकतील. सदर कार्यक्रमाच्या माहितीकरीता २० नोव्हेंबर २०२३ ला गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथे उद्योकता जागृती मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे.
प्रवेश अर्ज व अधिक माहितीकरीता प्रकल्प अधिकारी, मिटकॉन, गडचिरोली, देविचंद मेश्राम द्वारा जिल्हा उद्योग केंद्र, कॉम्पलेक्स, गडचिरोली येथे संपर्क करावा. असे आवाहन महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र, गडचिरोली यांनी एक पत्रकाद्वारे केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here