क्रिप्टो करन्सीमध्ये फसवणूक ; तब्बल ३६ लाख बुडाले आणि…

934

– सायबर सेलने केले असे काही…
The गडविश्व
ठाणे, १८ जून : क्रिप्टो करन्सीमध्ये फसवणूक झाल्याने तब्बल ३६ लाख येथील एका मोबाईल दुकानदाराचे बुडाले. मात्र सायबर सेलच्या मदतीने दुकानदारास तब्बल एका वर्षानंतर संपूर्ण रक्कम परत मिळाली. मीरा-भायंदर आणि वसई-विरार पोलीस आयुक्तांच्या सायबर विभागाने या घटनेचा संपूर्ण तपास केला. त्यामध्ये, चीनी नागरिकाचा समावेश असल्याचे उघडकीस आले आहे. त्यानंतर, त्यास अटक करण्यात आली.
एमबीवीवी सायबर सेलचे वरिष्ठ निरीक्षक सुजीत कुमार गुंजकर यांनी सांगितले की, फेब्रुवारी २०२२ मध्ये व्यापाऱ्यांशी संलग्नित एका व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी झाल्यानंतर पीडित व्यक्तीला क्रिप्टोकरन्सीचे लालच दाखवण्यात आले. या ग्रुपची ॲडमिन एक महिला होती, जिने संबंधित व्यापाऱ्यास क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करण्याचे अमिष दाखवले तसेच चांगले रिटर्न्स देण्याचे आश्वासनही दिले होते. या महिलेच्या अमिषाला बळी पडून मोबाईल वापाऱ्याने एका मोबाईल ॲपच्या माध्यमातून तब्बल ३६ लाख रुपये क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवले होते. ३९,५९६ अमेरिकी डॉलरची ही गुंतवणूक होती. दरम्यान, गतवर्षी मे महिन्यात हा व्हॉट्सअप ग्रुप बंद झाला. तर, अनेकदा प्रयत्न करुनही संबंधित ग्रुपच्या ॲडमिनसोबत संपर्क होऊ शकत नव्हता. त्यामुळे, आपली फसवणूक झाल्याचे पीडित फिर्यादीच्या लक्षात आल्यानंतर मोबाईल दुकानदाराने सायबर पोलिसांशी संपर्क साधत तक्रार दाखल केली.
तक्रारीनंतर सायबर पोलिसांनी तपास सुरू केला. त्यावेळी, त्यांना ओकेएक्स (OKX) नावाच्या एका एजन्सीचा तपास लागला. जी एजन्सी क्रिप्टोकरन्सी एक्सचेंजचे काम करत होती. याच तपासादरम्यान पोलिसांना एका फेक क्रिप्टोकरन्सी वॉलेटचा शोध लागला. पोलिसांनी ओकेएक्स एजन्सीशी संपर्क केला असता हा वॉलेट एका चीनी नागरिकाचा असल्याचे उघडकीस आले. तसेच, पीडित फिर्यादी व्यक्तीस ज्या मोबाईल नंबरवरुन संपर्क करण्यात आला होता, ते नंबरही हाँगकाँगचे असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. त्यानंतर, पोलिसांनी ४२० अंतर्गत गुन्हा दाखल करुन चीनी नागरिकास अटक केली. तर क्रिप्टोकरन्सी पैसे गुंतवणूक करतांना सावधगिरी बाळगणे आवश्यक असून अनेक एजन्सी कार्यरत आहेत ते चांगले रिटर्न देण्याचे सांगण्यात येते व या आमिषाला नागरिक बळी पडतात व अशा घटना घडतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here