– एक जवान शहीद, अनेक जखमी; नक्षल चळवळीला जबर धक्का
The गडविश्व
नारायणपूर, दि. २१ : छत्तीसगडमधील अतिदुर्गम आणि नक्षलवाद्यांच्या बालेकिल्ला ठरलेल्या अबूझमाडच्या जंगलात बुधवारी सकाळी मोठी चकमक उडाल्याची माहिती समोर येत आहे. दंतेवाडा, नारायणपूर आणि बीजापूर या तीन जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या बोटेर गावाजवळ झालेल्या या चकमकीत तब्बल २७ नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षाबळांना यश आले, ज्यात नक्षल चळवळीचा कुख्यात सरचिटणीस बसवा राजू याचा समावेश आहे. बसवा राजूवर १ कोटी ५० लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. त्याच्या मृत्यूनंतर नक्षल चळवळीला मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे.
ही चकमक DRG, STF आणि CRPF च्या संयुक्त पथकाने अंमलात आणलेल्या ऑपरेशनचा भाग होती. या कारवाईदरम्यान एक जवान शहीद झाला असून अनेक जवान जखमी झाले आहेत. त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहेत.https://x.com/ANI/status/1925187347701780682?s=09
खास गुप्त माहितीच्या आधारे सुरक्षाबळांनी बोटेर परिसरात सर्च ऑपरेशन सुरू केले होते. जवान जंगलात प्रवेश करताच नक्षलवाद्यांनी बेधडक गोळीबार सुरू केला. मात्र सजगतेने आणि काटेकोर प्रत्युत्तर देत जवानांनी नक्षलवाद्यांचे मनसुबे उधळून लावले.
सुमारे तीन तास चाललेल्या या चकमकीनंतर, घटनास्थळी २७ नक्षलवाद्यांचे मृतदेह आढळले. मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे, स्फोटके, वायरलेस सेट्स आणि नकाशे जप्त करण्यात आले. ठार झालेल्यांमध्ये नक्षल चळवळीतील अनेक कडव्या कमांडर्स चा समावेश आहे, त्यामुळे नक्षल नेटवर्कला जबर हादरा बसल्याचे उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले.

#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #cgnews #Abujhmad #Naxalism #Encounter #AntiNaxalOperation #SecurityForces #BaswaRaju #MaoistEncounter #Chhattisgarh #NaxalAffectedAreas #MartyrSoldier #BoteraEncounter
#अबूझमाड #नक्षलवाद #चकमक #सुरक्षाबळांचेऑपरेशन #नक्षलप्रभावितपरिसर #बसवा_राजू #शहीदजवान #नक्षलविरोधीमोहीम
#छत्तीसगड #बोटेरचकमक #गडविश्व