अर्जुनी – वडसा मार्गावर भीषण अपघात, दुचाकी चालक जागीच ठार

181

The गडविश्व
ता.प्र / अर्जुनी, दि. २२ : गोंदिया जिल्हयातील कोहमारा अर्जुनी वडसा मार्गावरील ईटखेडा नजीक ट्रक ने दुचाकीस जबर धडक दिली. या भीषण अपघाात दुचाकी चालक जागीच ठार झाल्याची घटना २१ मार्च रोजी दुपारी १२.३० वाजताच्या दरम्यान घडली. जितेंद्र मनोहर नेवारे ( वय अंदाजे ३३) रा. येगाव जानवा ता. अर्जुनी मोरगावे असे अपघातील मृतकाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जितेंद्र हा दुपारच्या सुमारास मोरगाव येथून दुचाकीने येगाव जानवा येथे जात होता. दरम्यान ईटखेडा नजीक समोरून विरूध्द दिशेने येणाऱ्या सीजी ०८ एएक्स ६६६१ क्रमांकाच्या भरधाव ट्रकने दुचाकीस धडक दिली. यात दुचाकीस्वार जितेंद्र जागीच ठार झाला. अपघात ऐवढा भीषण होता की मृतकाच्या शरीराचे तीन भाग झालेले होते. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाली व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी पोलीसांनी ट्रक चालकास अटक करून गुन्हा दाखल केला आहे.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #Accidentnews #arjunimorgav #wadsadesaiganj)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here