The गडविश्व
गडचिरोली, दि. ०४ : शेतकरी, कष्टकरी जनतेच्या समस्यांशी सत्ताधारी भाजप सरकारला कोणतेही देणेघेणे उरले नाही. हे सरकार इडीचा धाक दाखवून विरोधकांना शांत करून शेतकऱ्यांच्या शेतजमीनी कवडीमोल भावाने लाटण्याचा सपाटा लावला आहे. भांडवलदारांना लुटीची मोकळीक देवून राज्यात शेतकऱ्यांना उध्वस्त करण्याचे काम देवेंद्र फडणवीस सध्या करीत आहेत असा घणाघात शेतकरी कामगार पक्षाचे राज्य सहचिटणीस राहुल देशमुख यांनी केला.
शेतकरी कामगार पक्षाच्या ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त गडचिरोली येथे आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. राहुल देशमुख पुढे म्हणाले की, राजकीय क्षेत्रात लबाडांचा मोठा शिरकाव झाला असून नेते स्वतः च्या फायद्यासाठी रोज नवनवीन पक्ष बदलतात. काहीजण ईडीच्या धाकाने भाजपला शरण गेले. आता डाव्या पुरोगामी नेत्यांना शांत करण्यासाठी जनसूरक्षा कायदा केला असला तरी आम्ही देवेंद्र फडणवीसांच्या कटकारस्थानाला घाबरणार नसून गेल्या ७८ वर्षांत शेतकरी कामगार पक्षाच्या जून्या पिढीने जे काम या राज्यातील शेतकरी, कष्टकरी, कामगारांसाठी केले, तेच काम आम्ही रस्त्यावर उतरून अन्यायाच्या विरोधात करत राहू असा इशाराही राहुल देशमुख यांनी फडणवीस सरकारला दिला.
या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी शेतकरी कामगार पक्षाच्या आदिवासी, भटके विमुक्त आघाडीचे प्रदेशाध्यक्ष रामदास जराते, प्रमुख अतिथी म्हणून विद्यार्थी आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष साम्या कोरडे, महिला नेत्या जयश्रीताई जराते, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव काॅ. अमोल मारकवार, आझाद समाज पक्षाचे विदर्भ सचिव धर्मानंद मेश्राम, जिल्हाध्यक्ष राज बन्सोड, जिल्हा खजिनदार शामसुंदर उराडे, जिल्हा समिती सदस्य डॉ. गुरुदास सेमस्कर, अक्षय कोसनकर, रमेश चौखुंडे, चंद्रकांत भोयर, चिरंजीव पेंदाम, अशोक किरंगे, पांडुरंग गव्हारे, दामोदर रोहणकर, दिपक डोंगरे, अनुप चोरघडे, कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष पवित्र दास, रस्ते – महामार्ग बाधीत आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर गव्हारे, शिक्षक आघाडीचे जिल्हाध्यक्ष शर्मीश वासनिक, आदिवासी आघाडीचे जिल्हाध्यक्ष रामदास आलाम, भटके – विमुक्त आघाडीचे जिल्हाध्यक्ष डंबाजी भोयर, महिला जिल्हाध्यक्षा कविता ठाकरे, पोर्णिमा खेवले, निशा आयतुलवार, सरपंच छाया मंटकवार, विद्यार्थी आघाडीच्या जिल्हाध्यक्षा अभिलाषा मंडोगडे, युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष गुड्डू हुलके मंचावर प्रामुख्याने उपस्थित होते.
धारावी पुनर्विकास प्रकल्प आणि गडचिरोलीत स्टील हब हे अदानी – जिंदालचे पोट भरण्यासाठी असून भूमीपुत्रांच्या जमीनी लाटून देशोधडीला लावण्याचे षडयंत्र आहे. ते जनतेनी हाणून पाडले पाहिजे अशी अपेक्षा विद्यार्थी आघाडीच्या जिल्हाध्यक्षा साम्या कोरडे यांनी व्यक्त केली. जिल्ह्यातील डाव्या – पुरोगामी पक्षांना एकत्र घेवून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सामोरे जाणार असून शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्ते – पदाधिकाऱ्यांनी कामाला लागावे, असे आवाहन आदिवासी, भटके विमुक्त आघाडीचे प्रदेशाध्यक्ष रामदास जराते यांनी केले.
दरम्यान पक्षाच्या वतीने मेळाव्याला उपस्थित महिला कार्यकर्त्यांना साड्या आणि टि – शर्टाची भेट देण्यात आली. मेळाव्याचे प्रास्ताविक जयश्रीताई जराते यांनी केले. संचालन पोर्णिमा खेवले तर आभार प्रदर्श अक्षय कोसनकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी योगेश चापले, महेंद्र जराते, सुरज ठाकरे, सोनाली कवडो, भिमदेव मानकर, राजू केळझरकर, सुभाष आकलवार, मंगेश येनप्रेड्डीवार, मारोती आगरे, देवराव शेंडे, पोर्णिमा कांबळे, संगिता चांदेकर, छाया भोयर यांनी परिश्रम घेतले.
#thegdv #thegadvishva #gadchirolipolice #gadchirolinews #FarmersProtest #FadnavisGovernment #FarmersRights #PoliticalAttack #LandGrab #CorporateLoot #EDThreat #LeftWingUnity #RahulDeshmukh #PoliticalRally #GadchiroliNews #FarmersVoice #SocialJustice #AntiFarmerPolicy #FarmersStruggle #WorkersMovement #SaveFarmersLand #PoliticalCriticism #AdaniAmbaniPolitics #GrassrootsPolitics #शेतकरीआंदोलन #फडणवीससरकार #शेतकरीपक्ष #भांडवलदारविरुद्ध #जमीनलूट #राजकीयटिका #शेतकरीउध्वस्त #गडचिरोली #शेतकरीकामगारपक्ष #राजकीयमेळावा #ईडीधाक #जनसुरक्षाकायदा #डावेपुरोगामी #राहुलदेशमुख #शेतकऱ्यांचाआवाज #राजकारणविरोधात #राजकीयआक्रमण #माथाडी #शेतकरीहक्क #स्थानिकनिवडणूक
