राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज करण्यास मुदतवाढ

180

The गडविश्व
गडचिरोली, दि.०३ : भारत सरकारच्या खेल व युवा मंत्रालयामार्फत मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार, अर्जुन पुरस्कार, द्रोनाचार्य पुरस्कार, ध्यानचंद पुरस्कार, राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार आणि मौलाना अब्दुल कलाम ट्राफी याकरीता नाम निर्देशित करण्याची अंतिम तारीख ०४ ऑक्टोंबर, २०२३ पर्यंत होती. परंतु सदर नाम निर्देशित करण्याची तारीख शुक्रवार १० नोव्हेंबर २०२३ पर्यंत करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवार, खेळाडू, मार्गदर्शक यांनी dbtyas-sports.gov.in या पोर्टलवर जाऊन आपले अर्ज अपलोड करावे. अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी प्रशांत दोंदल हे कळवित आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here