फिट इंडिया मुव्हमेंट अंतर्गतच्या सामान्य ज्ञान चाचणीस मुदतवाढ

189

The गडविश्व
गडचिरोली, दि.०३ : केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा मंत्रालय यांच्या वतीने शालेय विद्यार्थांसाठी क्रीडा विषयक सामान्य ज्ञान चाचणीचे आयोजन सन 2019 पासून करण्यात येत आहे. सन 2022 मध्ये Fit India Quiz 2 चे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना खेळण्याविषयक असलेले ज्ञान, कौशल्य इ. साठी व्यासपीठ उपलब्ध करुन देणे. भारतीय खेळांचा समृद्ध इतिहास स्थानिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळ भारतीय खेळाडू इ. बाबत विद्यार्थांमध्ये जाणीव जागृती निर्माण करणे हा या चाचणीचा प्रमुख उद्देश असून यामध्ये रु. 3.25 कोटींच्या बक्षीसांचे विद्यार्थी व शाळांना वाटप करण्यात आले. याप्रमाणेच केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा मंत्रालय यांच्या वतीने शालेय विद्यार्थांसाठी क्रीडा विषयक सामान्य ज्ञान चाचणीचे Quiz 3 चे आयोजन करण्यात येत आहे. बक्षीसाची रक्कम मागील वर्षासारखीच आहे. पुर्ण भारतभर यासाठी विद्यार्थांची नोंदणी 5 सप्टेंबर, 2023 पासून सुरु झाली आहे आणि 5 ऑक्टोंबर 2023 ही नेांदणी करण्यासाठीची शेवटची तारीख होती. परंतु जास्तीत जास्त सहभागाकरीता नोंदणी करण्याच्या अंतिम तारीख दि. 31 ऑक्टोंबर, 2023 ही तारीख करण्यात आलेली होती. सद्यस्थित या टिप्पणी अन्वये रजिस्ट्रेशन करण्याची अंतिम तारीखेत मुदतवाढ देण्यात येऊन दि. 10 नोव्हेंबर, 2023 पर्यंत करण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील सर्व शाळा व विद्यार्थी https://fitindia.nta.ac.in/ या वेबसाईटवर विद्यार्थ्यांची नोंदणी करावयाची आहे व ही बाब क्रमप्राप्त आहे. उपरोक्त प्रश्नमंजुशामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी व शाळा यांनी सहभाग नोंदवावा असे जिल्हा क्रीडा अधिकारी प्रशांत दोंदल आवाहन करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here