रांगी येथे तंटामुक्त समितीची निवड
The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि. १८ : धानोरा तालुक्यातील रांगी येथे नुकताच ग्रामपंचायत सभागृहात खास ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. ग्रा.पं. कार्यालय रांगी येथे दुपारी १.०० वाजता पेसा ग्रामसभेचे आयोजन सरपंचा श्रीमती फालेश्वरी प्रदिप गेडाम यांच्या अध्यक्षतेत घेण्यात आली. त्यात उपस्थीतांचे स्वागत करून सन २०२४-२०२५ या वर्षा करिता महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे नव्याने पुनःगठण करण्यात आले. ग्रामस्थांच्या मदतीने एकुण २२ सदस्यांची महात्मा गांधी तंटामुक्त समिती रांगी २०२४-२५ करीता सर्वानुमते सभेत ठरविण्यात आले.
त्यात तुळशिराम लक्ष्मण भुरसे (से. नि.)अध्यक्ष, सौ. फालेश्वरी प्र. गेडाम (सरपंच)सदस्या, नरज सुरेश हलामी (उपसरपंच) सदस्य, हरीजी दसरराना वाल तज्ञदे (गुरुदेव सेवा मंडळ) सदस्य, नरेंद्र काशिनाथ भुरसे
(सा. का.)सदस्य, देवराव रूषी कुनघाडकर (पत्र.)सदस्य, सचिन काशिनाथ पोहनकर (यु. प्र.)सदस्य, भारत रविंद्र रोहनकार (पद.) सदस्य, साजीद अहमदखान पठाण (अल्प.) सदस्य, प्रल्हाद दाजीबा उंदीरवाडे (से.नि.)सदस्य, बाजिराव मंगु बोगा (वि. प्र.)सदस्य, श्रीमती. पुष्पाताई गुलाब अंबादे (म. ब.) सदस्या, श्रीमती. माधुरी नंदु हेमके(म. ब.) सदस्य, श्रीमती. मनिषा वसंत ऋतु (मा. प्र.) सदस्या, श्रीमती. वर्षा विलास पदा (मा. प्र.) सदस्या, श्रीमती. अंतकला संजय दुगे (म. ब.) सदस्या, श्रीमती. मुमताज शमिरखॉ पठान (अल्प.) सदस्या, श्रीमती. शशिकला उमाजी मडावी (मा. प्र.) सदस्या, नंदुजी शामराव मडावी (मा. प्र.) सदस्य, श्रीमती डॉ. सध्या सिंग (प्रा. आ. के. डॉ.) सदस्या, मकरंद बी. बांबोळे (ग्रामसेवक) सदस्य श्रीमती हजारे मॅडम (तलाठी) सदस्या, आकाश बांबोळे
(लाईन मॅ.) सदस्य टेंभुर्णे मेजर (बिट ज.) सदस्य, रामचंद्र मोहन काटेंगे पो.पा.निमंत्रक/सचिव पदिन निवड करण्यात आली आहे. सबब ठराव सर्वानुमते मंजुर करून कार्यकारिणी गठित करण्यात आली
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #dhanora)