कढोलीत सायकल अपघातात वृद्धाचा मृत्यू ; परिसरात शोककळा

338

The गडविश्व
ता. प्र/ कुरखेडा, दि. २८ : तालुक्यातील गांगोली येथील रहिवासी आनंदराव देऊजी मसराम (वय 60) यांचा काल सकाळी सायकल अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना कढोली तलावावरील पुलावर सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास घडली.
प्राप्त माहितीनुसार, आनंदराव मसराम हे आपल्या सायकलवरून गांगोलीहून कढोलीकडे जात असताना, पुलावरून जाताना त्यांचा सायकलवरील तोल गेला आणि ते सायकलसह थेट खाली कोसळले. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच कुरखेडा पोलीस ठाण्याचे ठाणेदार महेंद्र वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह तातडीने उपजिल्हा रुग्णालय, कुरखेडा येथे शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून, घटनेचा पुढील तपास सुरू आहे.
या दुर्घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून, मसराम कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. स्थानिक नागरिकांनीही या अपघाताबाबत हळहळ व्यक्त केली असून, पुलाच्या संरक्षक उपाययोजनांची मागणीही जोर धरू लागली आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here