एकलव्य रेसिडेंशियल पब्लिक स्कूल प्रवेशपुर्व परीक्षा २५ फेब्रुवारी ला

130

The गडविश्व
गडचिरोली, दि.२१ : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प भामरागड जि. गडचिरोली अंतर्गत सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात एकलव्य निवासी शाळांमध्ये इयत्ता ६ वी ते ८ वी चे वर्गात प्रवेश घेऊ इच्छिणा-या व इयत्ता ७ वी ते ९ वी वर्गातील अनुशेष भरून काढण्याची शासकीय/अनुदानित आश्रम शाळा, जिल्हा परिषद, नगरपालिका व इतर शासन मान्यता प्राप्त प्राथमिक/माध्यमिक शाळेतील अनुसुचित/आदिम जमातीच्या विद्यार्थ्याकरिता स्पर्धा परिक्षेचे आयोजन रविवार २५ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ११.०० ते १३.०० या वेळेत करण्यात येत आहे. इयत्ता ७ वी ते ९ वी च्या वर्गात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्याकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात आलेले असून सदर प्रवेश फॉर्म प्रकल्प कार्यालयाव्दारे शासकीय /अनुदानित आश्रम शाळा, जिल्हा परिषद येथे फॉर्म उपलब्ध करुन देण्यात येईल.
सदरची प्रवेशपुर्व परिक्षा शासकीय माध्यमिक आश्रमशाळा ताडगांव ता. भामरागड जि.गडचिरोली व शासकीय माध्यमिक आश्रम शाळा, कसनसूर ता.एटापल्ली जि.गडचिरोली या केंद्रावर घेण्यात येणार आहे. तरी विद्यार्थ्यांना परिक्षा केंद्रावर सकाळी ९.०० वाजता हजर राहावे. विद्यार्थ्यांना परिक्षा केंद्रावर सुरक्षितपणे आणण्याची जबाबदारी संबंधित आश्रमशाळा व इतर शाळा तसेच पालकांची आहे. परिक्षा केंद्रावर सर्व विद्यार्थ्यांनी वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, भामरागड जि. गडचिरोली, रोषना चव्हाण, यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here