– प्रेरणा कार्यशाळेतून शिक्षकांना उदबोधन
The गडविश्व
ता. प्र /धानोरा, दि. ०८ : तालुक्यातील समुह साधन केंद्रा तर्फे प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रमांतर्गत शासकीय माध्यमिक आश्रम शाळा मुरूमगाव येथे ७ ऑगस्ट ला पहिली शिक्षण परिषद, शिक्षक प्रेरणा कार्यशाळा म्हणून घेण्यात आली, त्यात ४७ शिक्षकांना उदबोधन करण्यात आले.
सदर कार्यशाळेचे उद्दघाटन आश्रम शाळा मुख्याध्यापिका मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली, दखणे विद्यालयाचे मुख्याध्यापक महेंद्र जांभूळकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून केंद्रप्रमुख अरुण सातपुते, मुख्याध्यापक रेवणाथ चलाख, युवराज जुवारे, मुख्याध्यापिका मडावी, कोलते आदी उपस्थित होते. प्रास्ताविक पर मार्गदर्शन करताना केंद्र प्रमुख अरुण सातपुते यांनी शिक्षकांनी अध्ययन निष्पत्ती वर आधारित पाठ टाचन काढून नवोपक्रम नियोजन करावे व विद्यार्थांची शैक्षणिक प्रगती साधावी असे प्रतिपादन केले.
तज्ञ मार्गदर्शक विजय कुमार रामटेके, मुलेवार, राजेश पदा, पुंडलिक पदा, पदवीधर शिक्षिका गायत्री खेवले यांनी अध्ययन स्तर विश्लेषण व कृती कार्यक्रम नियोजन, शिष्यवृत्ति मार्गदर्शन,सद्यस्थिती व आढावा, PAT व विध्यासमिक्षा केंद्र, विध्याप्रवेश,NAS अध्ययन निष्पत्ती व PGI, निपुण भारत ध्येय आणि क्षेत्र अध्ययन स्तर, पुस्तकातील कोऱ्या पानांचा प्रभावी वापर, आनंददायी शनिवार, परसबाग आदी विषयावर एकूण सात तासिकेतून शिक्षकांना उद् बोधन केले.
कार्यक्रमाचे संचालन पांडुरंग कांबळे यांनी केले आभार गायत्री खेवले यांनी मानले. शिक्षण परिषदेत केंद्रातील ४७ शिक्षकांनी सहभाग घेतला.
(#thegdv #gadchirolinews #gadchirolilocalnews )