The गडविश्व
ता.प्र/ कुरखेडा, दि. २३ : कुरखेडा ते कोरची राष्ट्रीय महामार्गाच्या प्रगतीकरणाचे काम वेगाने सुरू असले तरी रस्त्यावर उडणाऱ्या धुळीवर प्रशासनाने अद्याप कोणतेही ठोस उपाय केलेले नाहीत. विशेषतः कुरखेडा ते एरंडी फाटा दरम्यान मोठ्या प्रमाणात धुळीचे साम्राज्य असून, यामुळे प्रवासी आणि स्थानिक नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
रस्त्याच्या कडेला राहणाऱ्या नागरिकांचे दैनंदिन जीवनही यामुळे प्रभावित झाले आहे. धुळीमुळे श्वसनासंबंधी आजार, दृष्टीदोष आणि वाहतुकीस अडथळे निर्माण होत आहेत. प्रशासनाने तातडीने पाण्याचा फवारा मारण्यासह आवश्यक ती उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
जर लवकरच योग्य त्या उपाययोजना केल्या नाहीत, तर नागरिकांनी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.

#कुरखेडा #कोरची #राष्ट्रीयमहामार्ग #धूळसंकट #नागरिकत्रस्त #प्रशासनसावध #सार्वजनिकसुविधा #स्वच्छभारत #रस्त्यांचीदुर्दशा #गडविश्व #Kurkheda #Korchi #NationalHighway #DustProblem #CitizensSuffering #WakeUpAdministration #PublicIssue #CleanIndia #RoadConditions #GadVishwa #thegadvishva