स्कुल ऑफ स्कॉलर गडचिरोली चे माजी प्राचार्य डॉ. गणेश पारधी यांचे दुःखद निधन

377

The गडविश्व
गडचिरोली, २७ फेब्रुवारी : स्थानिक स्कूल ऑफ स्कॉलर चे ॲडमीन डायरेक्टर तथा माजी प्राचार्य डॉ. गणेश पारधी यांचे आज आकस्मिक दुःखद निधन झाले.
काल त्यांना ब्रम्हपुरी येथे उपचार करण्याकरिता रुग्णालयात भरती करण्यात आले होते मात्र त्यांची प्रकृती गंभीर झाल्याने पुढील उपचारसाठी त्यांना आज नागपूर येथे नेत असतांना संध्याकाळी उमरेड नजीक वाटेतच त्यांचे निधन झाल्याची माहिती आहे. उद्या त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहे. त्यांच्या निधनाची वार्ता ऐकताच शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली असून त्यांच्या निधनाने शैक्षणिक वर्तुळात मोठी हानी झाल्याचे मानले जात आहे. त्यांचे मागे पत्नी व एक मुलगी आणि मुलगा असा बराच मोठा आप्तपरिवार आहे. त्यांच्या निधनाने परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून गडचिरोली शहरात शोक व्यक्त करण्यात येत आहे.

(The Gadvishva) (Gadchiroli News Updates) (School Of Scholar Gadchiroli) (Dr. Ganesh Pardhi) (Principal Dr.Ganesh Pardhi Gadchiroli)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here