होय..डोनाल्ड ट्रम्प यांना अटक, काय आहे नेमके प्रकरण ?

223

– फौजदारी खटला दाखल
The गडविश्व
न्यूयार्क, ५ एप्रिल : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प न्यूयॉर्कमधील मैनहैटन कोर्टात हजर झाले असता पोलीसांनी त्यांना अटक केल्याची माहिती पुढे येत आहे. याबाबतचे वृत्त एका वृत्तसंस्थेने प्रकाशित केले आहे. तर न्यूयॉर्क ग्रँड ज्युरीने ट्रम्प यांच्यावर अॅडल्ट स्टार प्रकरणात फौजदारी खटला चालवण्यास मान्यता दिल्याने फौजदारी खटला दाखल करण्यात आलेले ट्रम्प हे अमेरिकेच्या इतिहासातील पहिले माजी राष्ट्राध्यक्ष बनणार आहेत.
डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फसवणुकीच्या ३० पेक्षा जास्त गुन्ह्यांचा आरोप असल्याचे कळते. यातील सर्वात गंभीर आरोप हा पॉर्न अभिनेत्री स्टॉर्मी डॅनियल्सला पैसे देण्याचा आहे असेही कळते. अशा प्रकारे गुन्हेगारी आरोपांना सामोरे जावे लागलेले ट्रम्प हे अमेरिकेच्या इतिहासातील पहिले राष्ट्राध्यक्ष बनले आहेत.

काय आहे प्रकरण ?

२०२६ च्या अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणूक प्रचारात आर्थिक गैरव्यवहार केल्याचा डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर आरोप ठेवण्यात आला. तर हे प्रकरण पॉर्न स्टारशी संबंधित असल्याचे कळते. डोनाल्ड ट्रम्प यांचे पॉर्न स्टार असलेल्या स्टॉर्मी डॅनियल्ससोबत अफेअर असल्याचा आरोप आहे आणि ही माहिती लपवण्यासाठी त्यांनी २०१६ मध्ये डॅनियल्सला १,३०,००० डॉलर दिल्याचा आरोप आहे. हे पैसे कोणत्या माध्यमातून देण्यात आले ? असा प्रश्न उपस्थित केला असून डोनाल्ड ट्रम्प यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले. तर डोनाल्ड ट्रम्प यांचे वकील मायकल कोहेन यांनी गुप्तपणे डॅनियल्सला पैसे दिले. त्यानंतर ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष असताना या काळात झालेल्या व्यवहारांची चौकशी सुरू झाली.

(The gadvishva) (the gdv) (donald trump) (Yes..Donald Trump arrested, what is the exact case?) (usa)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here