जिल्हास्तरीय एफ.सी. बायर्न फुटबॉल कप क्रीडा स्पर्धा संपन्न

178

The गडविश्व
गडचिरोली, १४ फेब्रुवारी : महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालया पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय गडचिरोली व जिल्हा क्रीडा परिषद गडचिरोली च्य संयुक्त विद्यमाने एफ.सी. बायर्न कप जिल्हास्तर फुटबॉल स्पर्धा इंदिरा गांधी मेमोरिय हायसकुल सुभाषग्राम, ता. चामोर्शी जि. गडचिरोली येथे ११ ते १२ फेब्रुवारी, २०२३ या कालावधीत संपन्न झाल्या.
सदर स्पर्धेचे उद्धाटन ११ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी ११.०० वाजता संपन्न झाले. कार्यक्रमाचे उद्घाटन पै. खाशाबा जाधव यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले व मैदानाची पुजा करुन सदर स्पर्धेचे उद्धाटन करण्यात आले. याप्रसंगी उद्धाटक म्हणुन गडचिरोली जिल्ह्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी प्रशांत दोंदल हे उस्थित होते. यांनी या प्रसंगी खेळाडूंना आपल्या मार्गदर्शनातुन खेळाचे महत्व पटवुन दिले, तसेच ग्रामपंचायत सुभाषग्राम येथील सरपंच, उपसरपंच उदय मंडल, शाळेचे प्राचार्य विधानचंद्र वेपारी, पंचायत समिती सदस्य सौ. आकोली दुलाल विस्वास,सौ. रेखा परिमल सरदार, माजी सरपंच सतिशचंद्र रॉय, फुटबॉल प्रशिक्षक प्रशांत मल्लीक हे होते. तर स्पर्धेचे पंच म्हणून विनय गोलदार, सतिश सरदार, मिथुन बिस्वास, इंद्रजीत सरकार, आशिष सरकार यांनी कार्य केले. तसेच क्रीडा स्पर्धेच्या यशस्वितेकरीता तालुका क्रीडा अधिकारी भास्कर घटाळे, क्रीडा अधिकारी घनश्याम वरारकर, क्रीडा मार्गदर्शक एस.बी. बडकेलवार यांनी कार्यवाही केली. तसेच उद्धाटन प्रसंगी सुभाषग्राम येथील बहुसंख्येने खेळाडू व क्रीडाप्रेमी उपस्थित होते.
सदर स्पर्धेमध्ये इंदिरा गांधी मेमोरियल हायस्कुल,सुभाषग्राम हा संघ विजयी झाला व उपविजयी रविंद्रनाथ टागोर हिंदी हायस्कुल, भवानीपुर हा संघ ठरला. स्पर्धेत पहिल्या व दुसऱ्या फेरीत पराभुत झालेल्या संघातुन ५ खेळाडूची निवड विभागीय स्तरावर निवडचाचणीकरीता करण्यात आलेली आहे. वरील प्रमाणे विजयी संघ व निवड झालेले खेळाडू वर्धा येथे आयोजीत होणाऱ्या विभागीय स्पर्धेत गडचिरोली जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे.स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंची भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली होती. स्पर्धेच्या आयोजनात इंदिरा गांधी मेमोरियर स्कुल, यांचे सर्व कर्मचारी यांनी सहकार्य केले .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here