गौरी -गणपत्ती उत्सवा निमित्य आनंदाचा शिधाचे लाभार्थ्यांना वाटप

138

The गडविश्व
गडचिरोली, ९ सप्टेंबर : सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अंत्योदय अन्न योजनेतील व प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेतील पात्र शिधापत्रिकाधारकांना “गौरी -गणपत्ती उत्सवानिमित्य ” अन्नधान्याव्यतिरीक्त प्रति शिधापत्रिका 1 किलो रवा, 1 किलो चणादाळ, 1 किलो साखर व 1 लिटर पामतेल या 4 शिधाजिन्नसांचा समावेश असलेला आनंदाचा शिधा (शिधा जिन्नस संच ) रास्तभाव दुकानामार्फतीने सर्व पात्र शिधापत्रिकांना 100/- रूपयामध्ये वाटप करण्यात येणार आहे.
गडचिरोली तालुक्यातील साखरा येथे तहसिलदार, गडचिरोली यांचे हस्ते “गौरी -गणपत्ती उत्सवानिमित्य “आनंदाचा शिधा लाभार्थ्यांना वाटप करून शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी निरीक्षण अधिकारी, गडचिरोली जे.एल.बारदेवाड, व पुरवठा निरीक्षक एस.एम.पंतगे, उपस्थित होते. पात्र शिधापत्रिकाधारकांनी शिधापत्रिका संलग्न असलेल्या रास्तभाव दुकानातून प्रति शिधापत्रिका 1 किलो रवा, 1 किलो चणादाळ, 1 किलो साखर व 1 लिटर पामतेल या 4 शिधाजिन्नसांचा समावेश असलेला आनंदाचा शिधा (शिधाजिन्नस संच) प्राप्त करून घ्यावा. असे तहसिलदार, गडचिरोली, महेंद्र गणविर, यांनी आवाहन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here