The गडविश्व
गडचिरोली, ६ फेब्रुवारी : सामान्य प्रशासन विभाग, जिल्हा परिषद, गडचिरोली येथे कार्यरत असलेले चंद्रशेखर पी. “रेवस्कर, वाहन चालक हे ३१ जानेवारी २०२३ ला नियत वयोमानाने शासकीय सेवेतुन सेवा निवृत्त झाले. त्याबद्दल त्यांचा सामान्य प्रशासन विभाग जिल्हा परिषद, गडचिरोली कडुन त्यांना त्यांचे सेवा निवृत्त पर देय असलेले निवृत्ती वेतन, उपदान, अंशराशीकरण इत्यादी सेवा निवृत्ती विषयक लाभ त्यांचे सेवा निवृत्ती दिनांकापुर्वी मंजुर करुन त्यांना देण्यात आले. तसेच ३० नोव्हेंबर २०२२ ला विभागात कार्यरत असलेले रफिक. आर. शेख वाहन चालक यांनाही त्यांचे सेवा निवृत्तीविषयक देय असलेले सर्व लाभ मंजुर करुन त्यांना अदा करण्यात आले. ३१ जानेवारी २०२३ रोजी वरील दोन्ही कर्मचाऱ्यांना एकत्रितपणे निरोप समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजेंद्र एम. भुयार, अति मुख्य कार्यकारी अधिकारी हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणुन शेखर माधव शेलार, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.), रविंद्र कणसे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत), सुरेंद्र दास गोंगले, सहा गट विकास अधिकारी (पंचायत) हे होते. कार्यक्रमाचे अध्यक्षांचे हस्ते दोन्ही कर्मचाऱ्यांना शाल, श्रीफळ भेट वस्तु व पी.पी.ओ. ( पेन्शन पेमेंट ऑर्डर) देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. जिल्हा परिषद, गडचिरोली कडुन आगामी सहा महिण्यामध्ये सेवा निवृत्त होणाऱ्या एकुण १३७ अधिकारी / कर्मचारी यांचे पैकी आता पर्यंत ५७ जणांचे सेवा निवृत्ती विषयक लाभ मंजुर करण्यात आलेले आहेत. सदर कार्यक्रमास सामान्य प्रशासन विभागातील श्रीमती जि.के. सोनकुसरे, स.प्र.अ., रितेश वनमाळी, क.प्र.अ. नरेश गुमडेलवार क.प्र.अ. बापुजी घोडमारे, क.प्र.अ. व विभागातील अधिकारी / कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व आभार सारंग गायकवाड, क. सहा यांनी केले.

(The Gadvishva ) (Gadchiroli News Updates) (Muktipath) (Guru Ravidas Jayanti 2023) (Pat Cummins) Thaipusam) (Steve Smith) (JEE Mains Answer Key 2023) (Chelsea) (PSG) vs Toulouse)