The गडविश्व
ता.प्र / धानोरा, दि. ११ : ग्रामीण रुग्णालय धानोरा येथे वैद्यकीय अधीक्षक डॉ. गजभे यांच्या प्रमुख उपस्थितीत जागतीक होमिओपॅथी दिवस साजरा करण्यात आला. तसेच आरोग्य सेवा सत्र आयोजित अंगणवाडी केंद्र कन्हारटोला येथे उपस्थितांना डॉ. मंजूषा लेपसे यांनी होमिओपॅथी बद्दल मार्गदर्शन केले. त्यात Empowering Research Enhancing Proficiency या संकल्पनेद्वारे आपण होमिओपॅथी मधे कसा विकास करू शकतो व त्याची सेवा लोकांना कशी देवू शकतो यावर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच यावेळी आरोग्य तपासणी करून होमिओपॅथी चे उपचार करण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन गिरीष लेनगुरे यांनी केले. यावेळी डॉ. सीमा गेडाम, डॉ. सुनीता नरडगे, डॉ. सीमा आटमांडे आणि ईतर आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #loksabhaelection2024 #dhanora )