The गडविश्व
ता. प्र/ प्रतिनिधी, दि. ०९ : धानोरा येथील जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात नुकत्याच घोषित झालेल्या इयत्ता बारावीच्या निकालानिमित्त तसेच इयत्ता ५वी ते ११वीच्या वार्षिक परीक्षेच्या निकालप्रसंगी गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार सोहळा संपन्न झाला.
सत्र २०२४-२५ मधील बारावी परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. दीपक तिरकीने प्रथम क्रमांक पटकावला, तर बबिता सोनुले व दिनेश वाघाडे यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवला. याशिवाय इयत्ता ५वीत शिष्यवृत्तीस पात्र ठरलेला कल्पक प्रमोद सहारे यालाही प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य व्ही. एम. सुरजुसे होते. प्रमुख अतिथी म्हणून शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा वेणूताई मशाखेत्री, उपाध्यक्ष जमीरभाई कुरेशी, सदस्य खुशाल मडावी, तालुका भाजपा अध्यक्ष साजन गुंडावार व पी. बी. तोटावार आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन परीक्षा विभाग प्रमुख पी. व्ही. साळवे यांनी केले तर आभार प्रदर्शन ए. बी. कोल्हटकर यांनी केले.
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक करत उपस्थितांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. शाळेतील वातावरण उत्साहाने भरले होते.
