धानोरा : पळवुन नेलेल्या ‘त्या’ अल्पवयीन मुलीचा व आरोपीचा अवघ्या २४ तासाच्या आत घेतला शोध

3436

– आरोपीस चौदाशे किमी अंतर पार करून पोलिसांनी केली अटक
The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि. ३१ : स्थानिक धानोरा येथील एका अल्पवयीन मुलीला एका अनोळखी इसमाने फुस लावून पळवून नेल्याची घटना २७ मे २०२४ रोजी घडली होती. सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेता अप्रहत मुलीच्या आईने‌ दिलेल्या‌ तोंडी रिपोर्टवरून पोलीस स्टेशन धानोरा येथे २८ मे २०२४ रोजी त्वरित गुन्हा नोंद करून सदर गुन्ह्याचा तपास पोउपनि स्वरूपा नाईकवाडे यांचेकडे देण्यात आला असता त्यांनी तपासाची चक्रे अधिक गतीने फिरवत अवघ्या चोवीस तासात पळवुन नेलेल्या त्या अल्पवयीन मुलीचा व आरोपीचा शोध घेतला. अनुज पाल, (वय ३७) रा. मेरठ (उ.प्र.) असे आरोपीचे नाव आहे. आरोपीविरुद्ध धानोरा पोलीस ठाण्यात विवध कलमान्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.

२७ मे रोजी धानोरा येथील एका अल्पवयीन मुलीला फुस लाऊन पळवून नेल्याची घटना उघडकीस आल्याने अप्रहुत मुलीच्या आई वडिलांनी याबाबत पोलीस ठाणे धानोरा येथे तक्रार दाखल केली. तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेता त्वरित गुन्हा दाखल करून सदर गुन्ह्याचा तपास पोउपनि स्वरूपा नाईकवाडे यांचेकडे देण्यात आला. गुन्हा नोंद होताच तपासी अधिकारी पोउपनि स्वरूपा नाईकवाडे यांनी नमूद अप्रहत मुलीचा शोध घेणे सुरू केले. तसेच अप्रत मुलीच्या आई-वडिलांकडे सविस्तर विचारपूस करून तपासा दरम्यान मिळालेल्या एका संशयित आरोपीच्या मोबाईल क्रमांक चे CDR व SDR ची माहीती काढून तांत्रिक बाबींच्या आधारे संशयित आरोपीच्या मोबाईलच्या शेवटच्या लोकेशन नुसार नमूद आरोपी हा नागपूरवरून छत्तीसगड एक्सप्रेस रेल्वेने प्रवास करीत असल्याचे दिसून आले तसेच सदरची रेल्वे ही नागपूर वरून मेरठ सिटी उत्तर प्रदेश येथे जात असल्याची माहिती मिळाली त्यामुळे त्या आरोपी सोबत नमुद अप्रहत असावी व तो तिला मेरठ (उत्तर प्रदेश) येथे घेऊन जात असल्याचा संशय आल्याने तपासी अधिकारी यांनी अशी माहिती पोलिस स्टेशन धानोरा प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक, धुळे यांना दिली असता त्यांनी सदरची माहिती आपले वरिष्ठांना दिल्यानंतर पोलिस अधिक्षक यांनी त्यांना तात्काळ शासकीय वाहन उपलब्ध करून दिले असता २८ मे २०२४ रोजी रात्रीच तपासी अधिकारी स्वरूपा नाईकवाडे व पोशि चव्हाण असे शासकीय वाहनाने १४०० कि.मी दूर असलेल्या मेरठ सिटी( उत्तर प्रदेश) येथे रवाना होऊन सायबर पोलीस स्टेशन गडचिरोली यांच्या मदतीने नमूद आरोपीला व अप्रहत मुलीला मेरठ सिटी उत्तर प्रदेश येथील रेल्वे स्थानकावरून ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन धानोरा येथे आणण्यात आले व तिचे आई-वडिलांच्या स्वाधीन करण्यात आले.
सदर गुन्ह्यात भादवि 376(2)(j), 376(3) सहकलम 4,6 पॉक्सो अधिनियम 2012 ची कलमवाढ करण्यात येवून आरोपीस तात्काळ अटक करण्यात आली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस अधीक्षक निलोत्पल, अप्पर पोलीस अधीक्षक कुमार चिंता, उपविभागीय पोलीस अधिकारी सुहास शिंदे उपविभाग धानोरा तसेच पोलीस निरीक्षक धुळे पो.स्टे.धानोरा यांचे मार्गदर्शनात पोउपनि स्वरूपा नाईकवाडे पोलीस स्टेशन धानोरा या करीत आहेत.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #dhanora)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here