धानोरा : ट्रकांची समोरासमोर भीषण धडक

31

धानोरा : ट्रकांची समोरासमोर भीषण धडक
The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि. १८ : धानोरा तालुक्यातील येरकड गावाजवळील टवेटोला येथील मुख्य महामार्गावरील पुलाजवळ 16 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 8 ते 9 वाजण्याच्या सुमारास दोन ट्रकांची समोरासमोर भीषण धडक झाली. या अपघातात दोन्ही वाहनांचे कॅबिन पूर्णपणे चकनाचूर झाले असले तरी सुदैवाने दोन्ही चालक सुरक्षित असल्याची माहिती मिळाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ट्रक क्रमांक MH-34 BH-9277 हा सूरजागड प्रकल्पातून लोखंडी गिट्टी घेऊन गडचिरोलीहून धानोरा मार्गे छत्तीसगड राज्याकडे जात होता. तर CG-10 BR-8556 हा ट्रक छत्तीसगडहून महाराष्ट्रात धानोरा मार्गे गडचिरोलीकडे भरधाव वेगाने येत होता. टवेटोला पुलाजवळ दोन्ही वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाली.
अपघातानंतर घटनास्थळी दोन्ही चालक उपस्थित नसल्याचे दिसून आले; मात्र त्यांना कोणतीही गंभीर दुखापत झाली नसल्याची माहिती समोर आली आहे. अपघातामुळे मुरुमगाव ते टवेटोला तसेच येरकड ते टवेटोला या मार्गांवर काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली. त्यामुळे इतर वाहनचालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.
टवेटोला हे क्षेत्र येरकड पोलीस मदत केंद्राच्या कार्यक्षेत्रात येत असून येरकड पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू असून पुढील तपास सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here