धानोरा तालुक्याचा इयत्ता बारावीचा निकाल ९१.५३ टक्के

193

The गडविश्व
ता. प्र/ धानोरा, दि.२२ : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ नागपूर विभागाद्वारे फेब्रुवारी २०२४ मध्ये इयत्ता बारावीची परीक्षा घेण्यात आलेली होती. त्या परीक्षेचा निकाल २१ मे २०२४ रोजी दुपारी ०१.०० वाजता शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर घोषित करण्यात आला. धानोरा तालुक्यामध्ये एकुण १५ उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय असून यामध्ये एकुण ६९२ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज केलेले होते. त्यापैकी ६२९ विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत. यात तालुक्याच्या निकालाची टक्केवारी ९१.५३ टक्के ऐवढि आहे.
तालुक्यातील इतर महाविद्यालयाच्या निकालामध्ये जिल्हा परिषद ज्युनिअर कॉलेज धानोरा निकाल ८९.४७ टक्के, लीसीट ज्युनिअर कॉलेज रांगी ७८.९४ टक्के, महेश सावकार पोरेड्डीवार चातगाव ८०.९५ टक्के, शासकीय पोस्ट बेसिक आश्रम शाळा रांगी ९४.२८ टक्के, जी. सी .पाटील मुनघाटे महाविद्यालय धानोरा ८५.१८ टक्के, रामचंद्र दखणे कनिष्ठ महाविद्यालय मुरूमगाव ९५ टक्के, जिजामाता उच्च माध्यमिक ईरुपटोला ९६.५५ टक्के, शासकीय उच्च माध्यमिक आश्रम शाळा कारवाफा १०० टक्के, शासकीय उच्च माध्यमिक आश्रम शाळा पेंढरी १०० टक्के, प्रियदर्शनी कनिष्ठ महाविद्यालय धानोरा ९०.४७ टक्के, राजीव गांधी कनिष्ठ महाविद्यालय कारवाफा १०० टक्के, शासकीय पोस्ट बेसिक उच्च माध्यमिक आश्रम शाळा सोडे ९७ टक्के, मातृभूमी कला कनिष्ठ महाविद्यालय पेंढरी ८१.८१ टक्के, भगवंतराव अनुदानित उच्च माध्यमिक आश्रम शाळा गट्टा ९३.५४ टक्के, जिल्हा परिषद जुनिअर कॉलेज मोहली ९१.०२ टक्के एवढा लागला असून धानोरा तालुक्यात तीन महाविद्यालयाने १०० टक्के निकाल दिलेला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here