धानोरा : लोकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या ग्रामपंचायत वर कारवाई करा

229

– गावकऱ्यांची मागणी
ता.प्र / धानोरा, २५ जुलै : तालुक्यातील रांगी येथील नळ योजनाचा पाणी पुरवठा भर पावसाळ्यात मागील सात दिवसापासून बंद असल्याने बिना बिल्चिंग केलेले दुषित पाणी लोकांना विहिर व बोरवेलचे प्यावे लागत असल्याने गावकऱ्यांच्या आरोग्याशी खेळनाऱ्या ग्रामपंचायतवर कारवाई करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
सध्या शेतीचा हंगाम सुरू असल्याने गावातील महिला व पुरुष शेतिच्या कामात व्यस्त असताना गावातील नळाचा पाणी पुरवठा ट्राँसफार्मर जळाल्याने बंद आहे. याचा त्रास महिलांना होतोय. गावात नळ योजना असल्याने गावातील विहिरी व हातपंपात ब्लिचिंगचा वापर केला नाही. पावसाळ्याच्या दिवसात दुषित पाणी पिल्याने लोकांच्या आरोग्यावर परिणाम झाल्यास जबाबदार कोण?
धानोरा तालुक्यातील रांगी येते लोकांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळण्यासाठी शासनाने नळ योजना कार्यान्वित करण्यात आली. पण हिच नळ योजना ट्रासफार्मर जळालाने मागील सात दिवसापासून बंद असल्याने येथील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी इतरत्र भटकावे लागत आहे. ऐन पावसाळ्याच्या दिवसात महिलांना शेतीकामात व्यस्त असताना पिण्याच्या पाण्यासाठी ताटकळत बसावे लागते. त्यातच दुषित पाणी प्यावे लागत असल्याने याचाही परिणाम लोकांच्या आरोग्यावर होणार असल्याची प्रतिक्रिया गावकरी देत आहेत.
ग्रामपंचायतकडुन सात दिवसापासून पाणी पुरवठा बंद आहे. ते जर इतके दिवस बंद राहणार आहे याची कल्पना ग्रामपंचायतला असेल तर प्रथम गावातील विहिरी व हातपंपात ब्लिचिंग पावडर टाकून पाणी स्वच्छ करायला पाहिजे होते पण ते ग्रामपंचायत ने केले नाही. त्यामुळे गावकऱ्यांना पावसाळ्यात तसेच पाणी प्यावे लागत आहे. अजुनपर्यंत नळाद्वारे मिळणाऱ्या पाण्यासाठी किती दिवस वाट पहावे लागनार ? जेवढे दिवस लोकांना पाणी मिळणार नाही तेवढे दिवसांचे ग्रामपंचायत पाणी कर कमी करणार आहे का? असा देखील प्रश्न करीत आहेत.
याबाबत संबंधित सचिवांनी वेळीच कारवाई करुन ट्राँसफार्मर लावुन गावकऱ्यांना पिण्यासाठी ‌पाणी नियमित नळाद्वारे देणे गरजेचे ‌असतांनाही सदर कामात हयगय करणाऱ्या व्यक्तिवर कारवाई होईल काय असाही प्रश्न गावकरी विचारीत आहेत.
जळलेला ट्रासफार्मर आज बदलविण्यात आले आहे.२४ तास चार्जिंग झाल्यानंतर नळाचे पाणी गावातील नळाला सोडले जाईल अशी प्रतिक्रिया सरपंचा सौ. फालेश्वरीताई प्रदिप गेडाम यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here