The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि. २८ : तालुक्यातील मुरूमगाव येथील जि. प. उच्च प्राथमिक केंद्र शाळेची विद्यार्थिनी कुमारी सुहानी जितेंद्र संगोडीया हिने आपल्या मेहनतीच्या जोरावर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत यश मिळवले आहे. तिच्या या उल्लेखनीय यशामुळे संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण आहे.
सुहानीच्या यशाबद्दल केंद्रप्रमुख अरुण सातपुते, मुख्याध्यापक रेवनाथ चलाख यांनी तिचे अभिनंदन केले. तसेच, शाळेतील पदवीधर शिक्षक चंदू रामटेके, गायत्री खेवले, जगदीश बावणे, सुमन किरंगे, कविता शेडमाके, संगीता भडके यांनी परीश्रम घेतले.
सुहानीने आपल्या यशाचे श्रेय वडील जितेंद्र संगोडीया, आई आणि गुरुजनांना दिले आहे. तिच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी सर्वत्र शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
#thegadvishva #thegdv #gadchirolipolice #gadchirolinews #navoday #murumgav #dhanora
