– उद्यानात आढळल्या दारूच्या बाटला
The गडविश्व
ता.प्र / धानोरा, २१ ऑगस्ट : तालुक्यातील एकमेव बगीचा धानोरा शहरांत आहे आणि तोही दुर्लक्षित होत चालला आहे. जिल्ह्यात दारूबंदी असतांनाही मात्र उद्यानात दारूच्या रिकाम्या बाटला आढळून आल्याने मद्यशौकीन दारू ढोसण्यासाठी उद्यानाचा वापर करत असावे असा अंदाज बांधण्यात येत आहे. धानोरा येथे उत्तमराव पाटिल जैव विविधता उद्यान आहे. मात्र या उद्यानाच्या प्रवेश दाराजवळ लावलेला फलकही पूर्णपणे फाटलेला आहे, उद्यानातील झाडांची निगा व कटाई न केल्यामुळे तसेच झाडाभोवती गवत कचरा मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे उद्यानाचे सोंदर्य विद्रुप झाले आहे. उद्यानात लहान मुलांच्या खेळण्याच्या साहित्याभोंवती गवत कचरा मोठ्या प्रमाणात वाढला आहे त्यामुळे तेथे सरपटणारे प्राणी जसे साप, विंचू यापासून लहान मुलांना तसेच मोठ्याना सुद्धा याचा धोका पोहचू शकतो तसेच या उद्यानात असणाऱ्या बेंच च्या खाली व बांबू झाडाच्या जवळ विदेशी दारूच्या बाटाला सोबत, चकणा ग्लास इत्यादी साहित्य पडुन आहे. त्यामुळे उद्यानात मद्यशौकीन दारू पितात हे यावरून दिसून येते. दारू पिणाऱ्या शौकीनांनी उद्यानाला दारूचा अड्डा बनविला कि काय ? असा प्रश्न निर्माण होतो. उद्यानाकडे वेळीच लक्ष देऊन निगा राखून सौंदर्य अबादित ठेवावे तसेच मद्य शौकिनांना वेळीच आळा घालावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.