The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि. ०७ : श्री. साईबाबा ग्रामीण विकास संस्था गडचिरोली संचालित श्री .जे .एस .पी. एम. महाविद्यालय धानोरा येथे ६ डिसेंबर महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे वरिष्ठ प्राध्यापक टिकाराम धाकडे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापिका निवेदिता वटक, प्राध्यापक कैलाश खोब्रागडे, प्राध्यापक भावीकदास करमनकर मंचावर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून या कार्यक्रमाला सुरुवात झाली. मान्यवरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले कार्य हे सर्व समाजातील तळागाळातील लोकांना प्रेरणा देणारे आहेत. त्यांनी दिलेल्या संविधानातून सर्वांचे हक्क व कर्तव्य यांची जाणीव सर्व नागरिकांना असावी असे अध्यक्ष भाषणातून प्रा.टिकाराम धाकडे यांनी सांगितले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक तसेच शिक्षकेतर कर्मचारी वसंत चुदरी, गणेश लांबट, भास्कर कायते, सजनपवार मॅडम बालाजी राजगडे तसेच शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कैलास खोब्रागडे, संचालन व आभार प्रा. वसंत आवारी यांनी मानले.