– हजारो शेतकऱ्यांचे धान्य वाऱ्यावर
The गडविश्व
ता.प्र / धानोरा, दि. २१ : तालुक्यातील सर्वात प्रथम क्रमांकावर असलेल ग्रामपंचायत मुरुमगाव येथील धान्य खरेदी केंद्र ११ डिसेंबर रोजी सुरू करण्यात आले. या धान्य खरेदी केंद्र फक्त तीन दिवस केवळ १९ शेतकऱ्यांची धान्य खरेदी करण्यात आले. सतत आठ दिवसांपासून धान्य खरेदी केंद्र बंद आहे. मुरुमगाव व परिसरातील हजारो शेतकऱ्यांनी आपले सातबारा ऑनलाईन केलेला असूनही धान विक्री केंद्र बंद असल्याने शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहे.
आठ दिवसांपासून धान्य खरेदी केंद्र बंद असल्यामुळे धान्य खरेदी करणाऱ्या संबंधित केंद्र व्यवस्थापक मिलिंद शिपिं यांना धान्य खरेदी केंद्र आठ दिवसांपासून का बंद आहे असे विचार पूस केली असता त्यांनी बारदाना उपलब्ध नाही. आपण बारदाना उपलब्ध करून देण्याची मागणी महामंडळाकडे केली आहे असे त्यांनी सांगितले.
मागील काळात सुद्धा मुरुमगाव धान्य खरेदी केंद्रावर लाखो, करोड चे नुकसान झालेले आहेत. करोडोच्या घोटाळ्यांवर आजही केंद्र व्यवस्थापक, केंद्र प्रमुख, ग्रेडर व काही व्यापारी वर्गावर कोर्टात केस सुरू आहेत. यात मुरुमगाव, मालेवाडा व परिसरातील काही व्यापारी वर्ग सूटले असे संशयी रूपात आढळून येत आहेत पण मुरुमगाव येथील शेतकरीवर्गाचे आज पर्यंत केंद्रावर विकलेले धान्य व बारदानाचे पैसे मिळाले नाहीत.
या वर्षी ऑनलाईन केलेले हजारो शेतकऱ्यांचे धान्य खरेदी केंद्रावर खरेदी होनार का? बारदाना ची कमतरता असल्यास शेतकऱ्याचे धान्य परिपूर्ण खरेदी केंद्रावर खरेदी करण्यास आदिवासी विकास महामंडळ उपप्रादेशिक कार्यालय धानोरा हे सक्षम राहतील का? असे अनेक प्रश्नन निर्माण होत आहेत. मुरुमगाव येथील व मुरुमगाव परिसरातील शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर मुरुमगाव येथील धान्य खरेदी केंद्र सूरू करण्यात यावे अन्यथा या बद्दल मोर्चा काढण्याचे निर्णय घेतला आहे.














