धानोरा : घरकुल लाभार्थ्यांना मिळणार ५ ब्रास वाळू

75

– आमदार डॉ.मिलिद नरोटे यांच्या प्रयत्नाला यश
The गडविश्व
ता. प्र/ धानोरा दि. ०३ : शहरासह तालुक्यात सध्या स्थितीत बहुतांश घरकुल चे बांधकाम मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. लाभार्थ्यांना शासनाकडून मोफत पाच ब्रास रेती अजून पर्यंत मिळाली नसल्यामुळे नाईलाजास्तव रेती अवैधपणे जास्त पैशांनी विकत घ्यावी लागत असल्याने जास्तिचे पैसे मोजावे लागत होते. आधिच पैशाची अडचण, बांधकाम करताना लाभार्थ्यांची हि अडचण लक्षात घेऊन आमदार डॉ.मिलिद नरोटे यांनी याबाबत वरिष्ठांशी बोलुन पत्र काढण्यास लावले. त्याच्या प्रयत्नांमुळे लाभार्थ्यांना पाच ब्रास वाळू मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
१३ डिसेंबर २०२४ रोजी आमदार डॉ. मिलिंद नरोटे हे धानोरा येथे आले असता जनतेला होणारा त्रास लक्षात घेऊन मोफत पाच ब्रास रेती लवकरात लवकर देण्याबद्दल भारतीय जनता पार्टी धानोरातर्फे विनंती केली होती. आमदार नरोटे यांनी त्वरित जिल्हाधिकारी गडचिरोली, तहसीलदार धानोरा यांना फोन करून लवकरात लवकर मोफत रेती लाभार्थ्यांना देण्यासाठी कारवाई करण्याचे सांगितले होते. त्यानंतर सुद्धा आमदार नरोटे यांनी वेळोवेळी स्वतः लक्ष देऊन येत असलेल्या सर्व अडचणी दूर करून लाभार्थ्यांना मोफत ५ ब्रास रेती देण्याबद्दल आज मंजुरी मिळवून दिली.
यामुळे नगरपंचायत क्षेत्रातील १९३ लाभार्थ्यांसह धानोरा तालुक्यातील २९१६ घरकुलांना पाच ब्रास प्रमाने १४५८० ब्रास रेती व संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यातील २८ हजार ५३३ घरकुल लाभार्थ्यांना पाच ब्रास प्रमाणे १४२६६५ ब्रास मोफत रेती मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here