– अतिक्रमण न काढल्यास नागरिकांचा आंदोलनाचा इशारा
The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि. ०६ : येथे पुर्वी ग्रामपंचायत अस्तित्वात होती त्यानंतर 2015 ला धानोरा नगरपंचायत झाले. धानोरा शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. धानोरा येथे महसूल आबादीची खाली जागा दिसली की नागरिक त्याठिकाणी अतिक्रमण करून त्या जागेवर सुरुवातीला तात्पुरत्या स्वरूपात कच्ची झोपडी तयार करतात व त्यानंतर त्याच ठिकाणी पक्के घर तयार करून जागा हडपली जाते. धानोरा येथील अशीच आबादी ची सर्वे क्रमांक ५२५ या आबादी ची जागा बस स्टॅन्ड ला लागून असलेल्या जागेवर नागरिकांनी अतिक्रमण करून त्याठिकाणी झोपडी बांधून जागेवर अनेकांनी कब्जा करून अतिक्रमण केलेले आहे. येथिल अतिक्रमणाकडे अधिकाऱ्याचे पुर्णतः दुर्लक्ष आहे. मोक्याच्या जागी अतिक्रमण केले असतानाही कोणीच लक्ष देत नसल्याने धानोरा शहरातील नागरिक आश्चर्य व्यक्त करीत आहे.
महसूल किंवा नगरपंचायतच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना माहित आहे तरी सुद्धा हे कर्मचारी अतिक्रमणाकडे जाणून बुजून दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिक करतांना दिसतात. अतिक्रमण काढण्याची जबाबदारी कोणाची आहे ? शासकीय जमिनीवर कब्जा करणाऱ्या लोकांचे अतिक्रमण कधी काढणार ? असा सवाल नागरिक विचारीत आहे. अतिक्रमण काढून त्याठिकाणी नागरिकांसाठी मनोरंजन पार्क बनवावे अशी मागणी होत आहे. शहरात कोणतेच पार्क नाही, वयोवृध लोकांकरिता गरज असूनही याकडे लक्ष द्यायला वेळ कोणाकडेच वेळ नाही. वृत्तपत्रात बातमी प्रसिद्ध झाली त्यावेळेस नगरपंचायतच्या मुख्याधिकारी यांना या अतिक्रमणा संदर्भात विचारले असता ती जागा महसूल विभागाने नगरपंचायत ला सुपूर्द केली नाही असे सांगितले होते. त्यानंतर तहसीलदार धानोरा यांना विचारणा केली असता त्यांनी या बाबतची माहिती घेऊन पुढील कारवाही करण्यात येईल असे सांगितले परंतु चार महिने लोटूनही महसूल विभागाणी कोणतीच कारवाई न केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या अतिक्रमण धारकांना महसूल विभागाची मूक संमती तर नाही ना? असा प्रश्न नागरिक विचारीत आहे.महसूल विभागाने अतिक्रमण धारकांना दंड भरून ती जागा त्यांना देऊ नये जर दिली तर आणि अतिक्रमण हटविले नाही तर नागरिकांकडून आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #dhanora )