– सावरगाव पोलीस मदत केंद्राचा पुढाकार
The गडविश्व
ता.प्र / धानोरा, १ एप्रिल : तालुक्यातील सावरगाव पोलीस मदत केन्द्रा अंतर्गत सिआरपीएफ बटालियन ११३ च्या वतीने सिव्हिक एक्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पोलीस मदत केन्द्र सावरगाव अतंर्गत परिसरातील मरकागावं, मोरचूल, मूलूलमेटा, कोसमी, बोदनखेङा, गजामेढी येथील महिलानां शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले. यावेळी उपस्थित महिलांना आत्मनिर्भर आणि स्वरोजगारा बदल मार्गदर्शन केले.
सिआरपीएफ बटालियन ११३ सावरगाव च्या वतीने राणीबाई श्यामसिगं नैताम मरकागावं, कमलाबाई रावन उसेंडी मरकागावं, रमूलाबाई दयाराम नैताम मोरचूल, शांति तेलेसकोर तिगा मूलूलमेटा, असोनातिन मानसिगं तूलावी बोदनखेडा, रमितीबाई सदाराम धुर्वे गजामेढी, रामसाबाई राजकुमार धुर्वे कोसमी, आश्विनी कुलदीप होळी कोसमी, फूलमाई सिगूंराम होळी कोसमी, बरसो आसाराम होळी कोसमी, आशाबाई मानसाय कोमरा बोदनखेडा, या या महिलांना शिलाई मशीन प्रदान केले.
या कार्यक्रमाचे आयोजन सिआरपीएफ बटालियन ११३ कंपनी रेजिमेंट सावरगाव केले होते. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती कमांडेंट जसवीर सिगं ११३ बटालियन सिआरपीएफ धानोरा, सेकंड कमांडेंट अनिल कुमार शर्मा ११३ बटालियन सिआरपीएफ धानोरा, असिस्टेंट कमांडेंट अजयकुमार लाकरा ११३ बटालियन सिआरपीएफ सावरगाव, वैद्यकीय अधिकारी आदित्य पुरोहित ११३ बटालियन सिआरपीएफ धानोरा, पोलीस प्रभारी अधिकारी रमेश पाटील पोलीस मदत केन्द्र सावरगाव, उपसरपंच कमलेश मडावी ग्रामपंचायत सावरगावं, पोलीस उपनिरीक्षक विषमभंर कराले पोलीस मदत केन्द्र सावरगाव, पोलीस उपनिरीक्षक नकाते पोलीस मदत केन्द्र सावरगाव व सि.आर.पी.एफ बटालियन ११३ चे सर्व अधिकारी, कर्मचारी, नागरीक उपस्थितीत होते.
कार्यक्रमाला कमांडेंट जसवीर सिगं ११३ बटालियन सिआरपीएफ धानोरा जनतेला मार्गदर्शन करताना शिक्षण आणि खेळांवर ध्यान केंद्रित करून वाईट काम व वाईट व्यसनाच्या विळख्यात सापडणार नाही याची काळजी घ्यावी व आपल्या कुटुंबाची आर्थिक प्रगती साधन्याचे आवाहन केले.
(The Gadvishva) (Gadchiroli News Updates) (The gdv) (Muktipath) (Chandrpur News Updates) (Game of Thrones) (Lucknow Super Giants) ( Man City) (Bihar Board 10th Result 2023) (JioCinema) (Tata ipl 2023) ( Naxalites set fire to a passenger bus)