The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि. १३ : तालुक्यातील कोल्हारबोडी येथील इसमाचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची घटना ११ ऑगस्ट रोजी उघडकीस आली. बावजी सुखरू बोगा (वय ५०) असे मृतकाचे नाव आहे.
११ ऑगस्ट रोजी खांबाडा येथील भास्कर शामराव मेश्राम यांच्या शेतावर धानाला बाशी मारण्याकरता बावजी बोगा,जगन मेश्राम व वामन वाढई हे तिघेही सकाळी ८ वाजताच्या सुमारास घरून नांगर घेऊन गेले. दरम्यान बाशी मारून झाल्यानंतर पाळीवरून नागर ओलांडत असतात अंदाजे साडेअकरा ते बारा वाजता दरम्यान बावजी बोगा यांच्या डाव्या पायाला विषारी सापाने दंश केला असता सोबतच्या सहकाऱ्यांनी लगेच मालेवाडा येथील रुग्णालयात हलविले. तिथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यासाठी भरती केले असता त्यांची प्रकृती जास्त खराब झाल्याने तेथील डॉक्टरांनी धानोरा येथे हलविले परंतु त्यांची प्रकृती चिंताजनक झाल्याने धानोरा येथुन सुद्धा डॉक्टरांनी गडचिरोली येथील सामान्य रुग्णालयात रेफर केले परंतु त्याची प्रकृती गंभीर असल्यामुळे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
सदर घटनेने कुटुंबावर शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
(#thegdv #thegadvishva #gadchirolipolice #gadchirolinews #gadchirolilocalnews )