धानोरा : शेतकऱ्यांच्या वारसांची 7/12 उताऱ्यावर नोंदणीसाठी विशेष शिबिर संपन्न
The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि. १६ : तालुक्यातील रांगी येथे १५ जानेवारी २०२६ रोजी मयत वनपट्टेधारक शेतकऱ्यांच्या वारसांची 7/12 उताऱ्यावर नोंदणीसाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिराचे मुख्य उद्देश शेतकऱ्यांच्या कुटुंबांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे आणि अधिकृत नोंदणी सुनिश्चित करणे हा होता.
शिबिरात नायब तहसीलदार बारापात्रे, वाळके आणि मंडळ अधिकारी श्रीमती वैशाली डोंगरे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. ग्राम महसूल अधिकारी आणि महसूल सेवकांचे पथकही यावेळी उपस्थित होते.
शिबिरादरम्यान बहुसंख्य शेतकऱ्यांचे अर्ज स्वीकारण्यात आले. प्रशासनाने लवकरात लवकर 7/12 उताऱ्यावर वारसांची नोंदणी पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. स्थानिक शेतकऱ्यांनी या उपक्रमाचे स्वागत केले.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews














