– वाहनासह ३३ लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त
The गडविश्व
गडचिरोली, ११ सप्टेंबर : आगामी गणेशोत्सवाच्या अनुषंगाने ११ सप्टेंबर रोजी अवैधरित्या प्रतिबंधीत सुगंधित तंबाखुची वाहतुक होणार असल्याच्या गोपनीय माहितीद्वारे देसाईगंज पोलिसांनी सापळा रचून दोघांना ताब्यात घेऊन झडती घेतली असता वाहनासह ३३ लाख ५० हजार ४८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
आशिष अशोक मुळे (३०), रा. खरबी, पोस्टे खेड, ता. ब्राम्हपुरी, जि. चंद्रपुर, अतुल देविदास सिंधीमेश्राम (२९), रा. भवानी वार्ड ता. ब्राम्हपुरी, जि. चंद्रपुर असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
गडचिरोली जिल्हयात अवैध सुगंधीत तंबाखु तस्करी व इतर अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी मा. पोलीस अधीक्षक नीलोत्पल सा. यांनी कठोर कार्यवाहीचे निर्देश सर्व पोस्टे/उप-पोस्टे/पोमके प्रभारी अधिकारी यांना दिले आहेत.
देसाईगंज पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक रासकर यांचे मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर धनगर, पोलीस अंमलदार राऊत, ढोके सराटे, कुमोटी यांनी सापळा रचून आशिष अशोक मुळे व अतुल देविदास सिंधीमेश्राम याना पकडून त्याचे ताब्यातुन लाल रंगाची टाटा कंपनीची आयशर वाहन क्र. एमएच ४० सिएम ६५५२ कि. अंदाजे. १० लाख रुपये, २४ नग मोठ्या पांढया रंगाचे प्लॅस्टीकच्या चुंगळीमध्ये प्रत्येकी ६ नग पांढऱ्या रंगाचे कट्टे व त्या प्रत्येक कट्ट्यामध्ये ११ नग पॅकेट व त्यावर ईगल हुक्का शिशा तंबाखु असे लिहिलेल्या प्रत्येक पॉकेटची किंमत ६४० रुपये असे एकुण १० लाख १३ हजार ७६० रुपये, २१ नग मोठ्या हिरव्या रंगाचे प्लॅस्टीकच्या चुंगळीमध्ये प्रत्येकी ४ नग पांढया रंगाचे कट्टे व प्रत्येक कट्टयामध्ये ४४ नग पॉकेट व त्यावर ईगल हुक्का शिशा तंबाखु असे लिहिलेल्या प्रत्येक पॉकेटची किंमत ३ हजार १०० रुपये असे एकुण ११ लाख ४५ हजार ७६०रुपये, १४ नग लहान पांढया रंगाचे प्लॅस्टीकच्या चुंगळीमध्ये प्रत्येक कट्टयामध्ये ५५ नग पॉकेट व त्यावर ईगल हुक्का शिशा तंबाखु असे लिहीलेल्या प्रत्येक पॉकेटची किंमत ३१० रुपये असे एकुण १ लाख ९० हजार ९६० रुपये असा एकुण ३३ लाख ५० हजार ४८० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन सदर बाबत अन्न सुरक्षा अधिकारी अन्न व औषध प्रशासन गडचिरोली यांना माहिती देत पो.स्टे. देसाईगंज येथे अन्न सुरक्षा अधिकारी अन्न व औषध प्रशासन गडचिरोली यांचे फिर्यादी वरुन गुन्हा नोंद करण्यात आला.
सदर कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक नीलोत्पल सा., मा. अपर पोलीस अधीक्षक (अभियान) अनुज तारे सा., मा. अपर पोलीस अधीक्षक अहेरी यतिश देशमुख सा. व उपविभागीय पोलीस अधिकारी साहिल झरकर सा., यांचे मार्गदर्शनात पोस्टे देसाईगंज येथील पोलीस निरीक्षक किरण रासकर यांचे नेतृत्वाखाली पोउपनि ज्ञानेश्वर धनगर, पोअं/दिनेश राऊत, नरेश कुमोटी, विलेश ढोके व संतोष सराटे यांनी पार पाडली आहे.