देसाईगंज : भीषण अपघातात एकजण जागीच ठार, एक गंभीर

2070

– देसाईगंज-कुरखेडा मार्गावर अपघात
The गडविश्व
ता.प्र / देसाईगंज, १५ जून : शहरातील कुरखेडा मार्गावर ट्रकची दुचाकीला धकड बसून झालेल्या भीषण अपघात दुचाकीचालक जगीच ठार तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवार १५ जून रोजी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास घडली. हिराकांत नेवारे (२४) रा.विसोरा असे मृतकाचे नाव आहे तर कामडी असे जखमीचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, देसाईगंज शहरातील कुरखेडा मार्गावर मृतक नेवारे व कामडी हे दुचाकीने जात असताना ट्रक ला ओव्हरटेक करत होते यावेळी ओव्हरटेक करण्याच्या नादात ट्रक चा पल्ला लागल्याने दुचाकी अनियंत्रित होऊन अपघात घडला. यात दुचाकीचालकाच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला तर मागे बसलेला गंभीर जखमी झाला. अपघाताची माहिती होताच देसाईगंज पोलिसांनी पंचनामा करून जखमीला गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केल्याची माहिती आहे. तर अपघात होताच ट्रक चालक हा फरार झाला. पुढील तपास देसाईगंज पोलीस करीत आहे.

हेलमेट असता तर वाचला असता जीव

सदर अपघात दरम्यान दुचाकी चालकाने हेलमेट लावले नव्हते अशी माहिती आहे. मृतकाच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्याचा जागीच मृत झाला. हेलमेट असते तर जीव वाचला असता अशी चर्चा प्रत्यक्षदर्शीतुन सुरू होती.

(the gdv, the gadvishva, gadchiroli news, desaiganj road accident)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here