बदलापूर घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीचे कुरखेडा येथील चौकात निदर्शने

227

The गडविश्व
ता. प्र / कुरखेडा, दि. २४ : बदलापूर येथे शाळेतील चिमूकली विद्यार्थिनीच्या लैंगिक शोषणाच्या निषेर्धात व आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी तसेच घटनेची जबाबदारी घेत गृहमंत्री यांनी राजीनामा द्यावा याकरीता आज महाविकास आघाडीच्या घटक पक्षाच्या वतीने कुरखेडा शहरातील सागर चौकात निदर्शने करण्यात येत शासनाच्या विरोधात नारेबाजी करीत निषेध नोंदविण्यात आला.
राज्यात बदलापूर नंतरही ठिकठिकाणी महिला तसेण लहान बालकावर अत्याचाराच्या घटना प्रकाशात येत आहेत. कायदा व सूव्यवस्थेचे धिंडवडे निघत आहे मात्र युती प्रणीत राज्य शासन स्वतःचीच पाठ थोपविण्यात मग्न आहेत. कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची नैतिक जबाबदारी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेन्द्र फडणवीस यांची आहे. त्यांनी महिलावर अत्याचाराच्या सत्राची नैतिक जबाबदारी घेत तात्काळ राजीनामा द्यावा याकरीता त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून प्रचंड नारेबाजी करीत निषेध नोंदविण्यात आला.
याप्रसंगी शिवसेना उबाठा गटाचे जिल्हाप्रमूख सूरेंन्द्रसिंह चंदेल, काँग्रेस तालूका अध्यक्ष जिवन पाटील नाट, जिल्हा उपाध्यक्ष जयंत पाटिल हरडे, माजी नगराध्यक्ष डॉ. महेन्द्र कुमार मोहबंसी, शिवसेना उबाठा ता.प्रमूख आशीष काळे, नगराध्यक्ष अनीताताई बोरकर, काँग्रेस महिला ता.अध्यक्ष आशाताई तूलावी, नगरपंचायत सभापती अशोक कंगाले, हेमलता नंदेश्वर, नगरसेवक जयेंद्रसिंह चंदेल, कांताबाई मठ्ठे, माजी जि.प.सदस्य प्रभाकर तूलावी, माजी पं.स. सभापती गिरीधर तितराम, माजी नगरसेवक उसमान खान, पुडलीक देशमुख, मनोज सिडाम, सोनू भट्टड, विजय पूस्तोडे, घिसू पाटील खूणे, आसिफ शेख, दशरथ लाडे, अयूब पठान, भावेश मुंगणकर, वैभव बंसोड, प्रविण खडसे, तूळशिराम बूरबांधे, पूरषोत्तम तिरगम, अज्जू सय्यद, राकेश चव्हाण तसेच महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थीत होते.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #kurkheda )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here