-गरुडझेप फाऊडेशन महा.राज्य च्या वतीने पुरस्कराकरिता निवड
The गडविश्व
गडचिरोली, दि.०२: सामाजिक क्षेत्रात सातत्यपूर्ण उत्कृष्ट कामगिरीची दखल घेऊन गरुड फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य तर्फे दिला जाणारा राज्यस्तरीय आदर्श पत्रकार दर्पणरत्न पुरस्कार कुरखेडा तालुक्यातील कुंभिटोला या छोट्याशा गावातील The गडविश्व या वेब न्यूज पोर्टल चे कुरखेडा तालुका प्रतिनिधी, युवा पत्रकार चेतन गंगाधर गहाने यांना जाहीर करण्यात आला आहे. २६ मे २०२४ रोजी पुणे येथे भव्य पुरस्कार वितरण सोहळा आयोजीत करण्यात आला आहे. त्यावेळी या पुरस्काराने गहाने यांना सन्मानित करण्यात येणार आहे.
कुरखेडा तालुक्यातील कुंभिटोला या छोट्याशा गावातील चेतन गहाने हे युवा असून आपल्या परिसरात होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढून नागरिकांना योग्य न्याय मिळावा यासाठी ते सुरुवातीपासूनच झटत आहेत. परंतु हे सर्व करीत असतांना उचित मार्गदर्शन मिळाले ते नासीर हाश्मी यांचे आणि त्यातून गहाने यांनी आपल्या परिसरातील समस्यांना वाचा फोडावी व नागरिकांना योग्य न्याय मिळावा यासाठी पत्रकारितेतील कलमेचा आधार घेण्याचा विचार मनी ठानुन गडचिरोली जिल्ह्यातील The गडविश्व या ऑनलाईन वेब न्यूज पोर्टलशी जुळून परिसरातील वाचा फोडण्यास सुरुवात केली. दरम्यानच्या काळात परिसरात होणाऱ्या अवैध रेती उपसा, विटा भट्टी वर लगाम लावण्यासाठी सहकाऱ्यासोबत बेमुदत उपोषण करून महसूल विभागाला अवैध रेती तस्करांवर कारवाई करण्यास भाग पाडून शासनाचा बुडत असलेल्या महसूल वाचविला. अशाचप्रकारच्या विविध कामगिरीची दखल गरुड फाऊंडेशनचा वतीने घेत गहाने यांच्या कार्याचा गौरव व प्रोत्साहन देण्याच्या हेतूने राज्यस्तरीय आदर्श पत्रकार दर्पणरत्न पुरस्कराकरिता निवड केली असल्याचे गरुड फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आकाश पुजारी यांनी कळविले आहे.
सदर पुरस्काराकरिता जाहीर झाल्याने चेतन गहाने यांनी हा पुरस्कार The गडविश्व चे संचालक / मुख्य संपादक जिवतोडे, तसेच मार्गदर्शक नासीर हाश्मी व समस्त कुरखेडा तालुका पत्रकार संघातील पदाधिकारी वाईस ऑफ मीडियाचे पदाधिकारी यांना समर्पित केलेला आहे. पुरस्कार जाहीर झाल्याने त्यांच्यावर शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #chetangahane #kurkheda )
