गडचिरोली शहरात श्रीकृष्णा जन्माष्टमी निमित्त दहीहांडी उत्सवात

52

– आमदार डॉ. देवराव होळी यांची उपस्थिती
The गडविश्व
गडचिरोली, दि. २८ : शहरात दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा श्रीकृष्णा जन्माष्टमी निमित्याने २७ ऑगस्ट रोजी दहीहंडी उत्सव विश्व हिंदू परिषद व बजरंग दल गडचिरोली च्या वतीने आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी प्रत्येक कुटुंबातील नागरिक निवासस्थानी जन्माष्टमी उत्सव मोठ्या उत्साहाने साजरे करतात. त्याच प्रमाणे सार्वजनिक उत्सवात मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून जन्माष्टमी उत्सव आनंदाने साजरा करून हिंदू संस्कृती जपावी असे आवाहन आमदार डॉ. होळी यांनी या दहीहांडी उत्सवात प्रमुख अतिथी म्हणून असताना केले.
या दहीहांडी उत्सवात मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. नागरिकांनी दहीहांडी उत्सवादरम्यान आनंद व्यक्त केला. आमदार डॉ. होळी यांनी मंगेश रणदिवे यांच्या निवासस्थानी जन्माष्टमी निमित्त गोपाळ काला कार्यक्रमात उपस्थिती दर्शविली.
यावेळी प्रामुख्याने भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, रामायण खटी, लोकसभा समन्वयक प्रमोद पिपरे, भाजपा जेष्ठ नेते रमेश भुरसे, शहर अध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, प्रशांत भ्रूगवार, दीपक भारसागडे, प्रकाश अर्जुनकर, चव्हाण, सलामे, राहुल भांडेकर, तसेच विश्व हिंदू परिषद व बजरंग दल पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी मंडळाचे कार्यकर्ते तथा नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here