राज्यात उद्या मतमोजणी ; पोलीस नक्षल चकमक उडाली, १० नक्षली ठार

4502

– नक्षल्यांच्या ठार झालेले आकडा वाढण्याची शक्यता
The गडविश्व
सुकमा, दि. २२ : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक २०२४ ची मतदानाची प्रक्रिया २० नोव्हेंबर रोजी शांततेत पार पडली असून उद्या २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी आहे. मात्र उद्या मतमोजणी असताना महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात तसेच राज्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेलगत असलेल्या छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात पोलिस आणि नक्षल्यांमध्ये आज सकाळच्या सुमारास चकमक उडाली. या चकमकीत १० नक्षली ठार झाल्याची माहिती समोर येत असून घटनास्थळावरून तीन स्वयंचलित शस्त्रेही जप्त करण्यात आल्याचे कळते. अद्यापही दोन्ही बाजूंनी जंगलात अधूनमधून गोळीबार सुरू असल्याचे समजते.

https://x.com/ANI/status/1859843379607245292?t=jggDAdsqPth8ikzJVTJW3g&s=19

सुकमा जिल्ह्यातील भेज्जी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भेज्जीच्या जंगलात मोठ्या प्रमाणात नक्षली असल्याची माहिती पोलीस दलास मिळाली असता नक्षलविरोधी अभियान राबविण्यात आले. दरम्यान नक्षल्यांनी पोलिसांच्या दिशेने गोळीबार केला असता पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात १० नक्षल्यांना ठार करण्यात पोलीस दलास यश आले आहे. सुकमाचे एसपी किरण चव्हाण यांनी घटनेला दुजोरा दिला असून हे मोठे यश असल्याचे त्यांनी म्हटले आहे. घटनास्थळावरून स्वयंचलित शस्त्रे व इतर सामान जप्त करण्यात आल्याचे कळते. तर या चकमकीत नक्षल्यांच्या मृतकांचा आकडा वाढण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolinews #gadchirolipolice #kurkheda #accidentpolicy #postoffice #muktipath #cgnews #sukma #behjjiforest )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here