MPSC परीक्षेत राज्यात तृतीय आलेल्या आरमोरी येथील पल्लवी कोटागले चा सत्कार

371

The गडविश्व
ता.प्र / आरमोरी, १७ जुलै : नुकत्याच जाहीर झालेल्या एमपीएससी परीक्षेत राज्यात तिसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या पल्लवी मधुकर कोटागले हिचा आरमोरी येथील राजपथ अकॅडमी येथे झालेल्या सोहळ्यात जाहीर सत्कार करण्यात आला.
आरमोरी सारख्या ग्रामीण भागातून पल्लवी ने मिळवलेल्या या दैदिपयमान यश्याबद्दल पल्लवी वर सर्व स्थरावरून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सदर सत्कार समारंभाला पल्लवी ने केलेल्या यशस्वी प्रवासाबद्दल जाणून घेण्यासाठी व मनोगत ऐकण्यासाठी बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते. शाल व श्रीफळ देऊन गौरविण्यात आले.
या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष भारत बावनथडे आरोग्य सभापती न.प आरमोरी, पंकज खरवडे, नंदकिशोर नाकतोडे, मुकुल खेवले, राजपथ अकॅडमी चे संचालक शशिकांत मडावी, मधुकर कोटगले, गणेश बैरवार, टिंकू बोडे, ठामेश्वर मैंद, अमोल खेडकर, जितू ठाकरे, अमित राठोड व राजपथ अकॅडमी चे बहुसंख्य विध्यर्थी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here