राजे शिव छत्रपती सार्वजनिक वाचनालय पोर्ला येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सोहळा संपन्न

178

The गडविश्व
गडचिरोली, १३ फेब्रुवारी : ग्रामपंचायत कार्यालय पोर्ला द्वारा संचालित राजे शिव छत्रपती सार्वजनिक वाचनालय पोर्ला येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सोहळा ११ फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात आला.
यावेळी विशेष मार्गदर्शन करण्याकरिता प्रमुख अतिथी म्हणून गडचिरोलीचे उपविभागीय पोलिस अधिकारी प्रणिल गिल्डा, ग्रामविकास अधिकारी डी. के. लाटेलवार, सरपंचा श्रीमती निवृता राऊत, गावचे पोलीस पाटील, ग्रामपंचायत सदस्य- अशोक बोहरे, सौ.काजल भानारकर, अश्विनी राऊत तसेच सर्व विद्यार्थी व पालक वर्ग प्रामुख्याने उपस्थित होते.
उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांनी विद्यार्थ्यांनी अभ्यास करताना पुस्तकातील प्रत्येक पान आपल्या जीवनाला कशाप्रकारे कलाटणी देऊ शकतात याचे महत्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. तसेच त्यांनी स्पर्धा परीक्षा देतांना येणाऱ्या अडचणींवर विद्यार्थ्यांनी कशा प्रकारे मात करावी आणि जीवनात समोर कस जावे या विषयी मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच ग्रामसेवक लाटेलवर यांनी विद्यार्थ्यांना जीवनातील ‘अ’ या अक्षराच महत्व समजावून सांगितले व आपल्या आयुष्यातील ध्येयावर एकाग्रपणे कशा प्रकारे राहावे याच महत्त्व विशद केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here