The गडविश्व
गडचिरोली, दि. ३१ : गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवराव होळी यांचे इंस्टाग्रामवर ५० हजार फॉलोअर्स निर्माण झाले आहेत त्यानिमित्त आमदार डॉ. होळी यांनी गडचिरोली येथील जनसंपर्क कार्यालयात केक कापून आनंद उत्सव साजरा करण्यात आला.
इंस्टाग्राम हे सामाजिक माध्यम असून याचे अनेक वापरकर्ते आहेत. लोकप्रतिनिधी यांचेही यावर खाते असून गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवराव होळी यांनीही आपला जनसंपर्क वाढावा, क्षेत्रातील नागरिकांना तसेच इंस्टाग्राम वापरकर्त्यांना विविध माहिती पोहचविण्यासाठी इंस्टाग्राम वर खाते तयार केले आहे. आमदार डॉ. देवराव होळी यांचे इंस्टाग्राम वर पन्नास हजार फॉलोवर्स तयार झाले असून त्यानिमित्ताने गडचिरोली येथील जनसंपर्क कार्यालयास केक कापून आनंद साजरा करण्यात आला.
यावेळी आमदार डॉ. देवराव होळी यांनी आपल्यावर प्रेम करणाऱ्या जनतेचे, कार्यकर्त्यांचे आभार मानले. यावेळी भाजपा गडचिरोली शहराचे अध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, शिंदे गटाचे दीपक भारसाकडे, हर्षल गेडाम, विलास नैताम, सचिन येनप्रेड्डीवार, चेतन बोरकुटे, अरबाज शेख सह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.