– कुणबी समाज व आमदार डॉ. देवराव होळी मित्र परिवाराचे आवाहन
The गडविश्व
गडचिरोली, दि. २१ : शहरातील चामोर्शी मार्गावरील सेलिब्रेशन हॉल येथे उद्या २२ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता कुणबी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून या मेळाव्याला कुणबी समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन कुणबी समाज बांधव व डॉ. देवराव होळी मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.
या मेळाव्यामध्ये नुकत्याच झालेल्या १०वी व १२ वी तील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच नवनियुक्त झालेले शासकीय कर्मचारी व अधिकारी यांचाही सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या मेळाव्याला कुणबी समाजातील वरिष्ठांचे मार्गदर्शन लाभणार असून त्यांचे मार्गदर्शन समाजाला प्रेरक ठरणार आहे. तरी या मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.