मुरुमगाव येथे स्व. रामचंद्र दखने विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयत बालक- पालक मेळावा

213

The गडविश्व
ता.प्र / धानोरा, ११ डिसेंबर : तालुक्यातील मुरुमगाव येथील स्व. रामचंद्र दखने विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे ९ डिसेंबर रोजी संस्था स्थापक स्व. केवटराम रामचंद्र दखने यांची पुण्यतिथी व बालक पालक मेळावा चे आयोजन करण्यात आले.
या काय॔क्रमाचे उदघाटक संस्था अध्यक्ष महेंद्र दखने मुरुमगाव, यांनी तर काय॔क्रमाचे अध्यक्ष श्रीमती कमलाबाई दखने मुरुमगाव होते. या काय॔क्रमाला प्रमुख अतिथी संस्था कोषाध्यक्ष करीमाताई निजार देवानी गडचिरोली, सरपंच शिवप्रसाद गवरना ग्रामपंचायत मुरुमगाव, हरिराम कवाडकर संस्था सदस्य मुरुमगाव, कृपाराम भूरकूरया संस्था सदस्य मुरुमगाव, जिजाताई लाडे संस्था सदस्य मुरुमगाव, रेखाताई मेसकर संस्था सदस्य मुरुमगाव, संस्था सदस्य मंगलाताई उईके , आत्माराम मेश्राम , ग्रामपंचायत सदस्य चारूलता मार्गीया , ग्रामपंचायत सदस्य अंजूताई मैदमवार , शैलाताई कवाडकर , श्यामबाई जाळे, मूनिर शेख, वसंत कोलीयारा , वैद्यकीय अधिकारी डॉ.राहूल बनसोड मुरुमगाव, मो.शरीफ भाई कूरैशी, कल्याणीताई महेंद्र दखने, प्रवीण दखने , मुख्याध्यापक सूरनकर , एम .डी. जाभूंळकर, बि.जे.मेश्राम, संतोष देशमुख, विलास चौधरी, रमेश निसार, शूरेश तूलावी, आर.पी.राणा उपस्थित होते.
बालक पालक मेळावा च्या निमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रम व क्रीडास्पर्धाचे आयोजन केले होते. खो-खो, कबड्डी, रांगोळी, स्पर्धेत विजयी प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेतर्फे ट्रॉफी, मेडल व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
या काय॔क्रमाचे संचालन बि.जे.बोरकर यांनी तर आभार बि.जे.मेश्राम यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here