The गडविश्व
मुंबई, दि. २३ : कौशल्य विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा कालावधी पाच वर्षांपर्यंत वाढवला गेला आहे असे काही सोशल मीडियावर फिरत असलेला शासन निर्णय खोटा असून, तो पूर्णतः अफवा आहे. यावर कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाने स्पष्ट केले आहे की, या योजनेचा कालावधी केवळ ११ महिन्यांचा आहे आणि यासाठी शासनाने कधीच ५ वर्षांचा कालावधी ठेवण्याचा निर्णय घेतलेला नाही.
राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचा अनुभव देऊन रोजगार मिळविण्याची क्षमता वाढवण्यासाठी ९ जुलै २०२४ रोजी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू करण्यात आली होती. योजनेत कार्यप्रशिक्षणाची मुदत पूर्वी सहा महिने होती, पण आता ती ११ महिन्यांपर्यंत वाढवण्यात आली आहे.
योजनेत सहभागी होणाऱ्या प्रशिक्षणार्थींना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार दरमहा विद्यावेतन दिले जाते. इयत्ता १२वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना ₹६,०००, आयटीआय अथवा पदविका धारकांना ₹८,०००, आणि पदवी किंवा पदव्युत्तर पदवीधारकांना ₹१०,००० असे विद्यावेतन दिले जाते. हे वेतन थेट आधार संलग्न बँक खात्यात जमा केले जाते.
सोशल मीडियावर फिरणाऱ्या खोट्या अफवांपासून नागरिकांनी सावध राहावे आणि अधिकृत शासकीय स्त्रोतांवरूनच माहिती मिळवावी, असे आवाहन कौशल्य विकास विभागाकडून करण्यात आले आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolnews #Gadchiroli #CMYouthTrainingScheme #SkillDevelopment #YouthEmpowerment #GovernmentScheme #EmploymentOpportunities #FakeNewsAlert #MaharashtraGovernment #VocationalTraining #YouthSkills #TrainingAndDevelopment #PublicAwareness #OfficialUpdate #StopFakeNews #मुख्यमंत्रीयोजना #युवासशक्तीकरण #कार्यप्रशिक्षण #कौशल्यविकास #युवायोजना #सरकारीयोजना #रोजगारअवसर #महत्वाचीनिर्णय #खोट्याअफवांपासूनसावध #MaharashtraGovt #SkillDevelopment #YouthEmpowerment #FakeNewsAlert
