– बेरोजगारांना प्रशिक्षण देऊन सक्षम करण्याचे मागिल शिंदे सरकारची योजना फोल ठरतय का?
गडविश्व
ता. प्र / कुरखेडा, दि. १२: मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षनार्थी पंचायत सहाय्यक संघटना तालुका कुरखेडा च्या वतीने आज मुख्यमंत्री यांना तहसीलदार कुरखेडा यांच्या मार्फत उपस्थित युवक व युवतींच्या हस्ते विविध मागण्यांसाठी निवेदन देण्यात आले.
निवेदनामध्ये पीडित प्रशिक्षणार्थीनी म्हटले आहे की २०२४ प्र. क्र. ९०–३ दि. ०९/०७/२०२४ अन्वये मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षनार्थी युवक युवती यांनी प्रशिक्षण घेतले आहे, या योजनेत महाराष्ट्रातील बारावी पास, पदविका आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांना सहा, आठ आणि दहा हजार रुपयांचे विद्यावेतन देण्याचे निश्चित केले होते त्यानुसार कार्यवाही सुरु झाली आणि या योजनेतील प्रशिक्षनार्थी नियमानुसार दिलेले काम करत आहेत परंतु विद्यावेतन वेळेवर मिळत नसल्यामुळे व हे विद्यावेतन या महागाईच्या काळात तुटपूंजी असल्याने प्रशिक्षनार्थिंची हेळसांड होत असल्याचे या निवेदनात म्हटले आहे.तत्कालीन मुख्यमंत्री यांनी आमचे लाडके भाऊ जिथे काम करत आहेत त्यांना तिथेच कायम होतील असे निवडणुकी पूर्वी आश्वासन दिले होते हे आश्वासन आता विद्यमान मुख्यमंत्री यांनी पुर्ण करून न्याय देण्यात यावे असेही या निवेदनात पीडित प्रशिक्षनार्थी युवक युवतींनी केलेली आहे.सदर निवेदन देतांना या संघटनेचे अध्यक्ष नेपाल मारगाये, उपाध्यक्ष कुमारी साक्षी हलामी, सचिव किशोर फटिंग, उमेश डोंगरवार, कमलेश सहारे, गोपाल बयाड, विलास कोडाप, जयंत चुरगाये, गणेश शेन्डे, चांदनी सहारे, लोकेश हजारे, लाकेश परशुरामकर, वॉल्मिक लाडे, सचिन सहारे, उन्मेश काम्बले, जागेश सहारे, छगन दुमाने, दुशान कापगते, पीयूष कुलमेथे, अमित चौहान, हर्शल गायकवाड, अतुल मेश्राम, प्रकाश मोहुरले, सत्यवान दाने, आम्रपालि सहारे, रीना लोहंबरे उपस्थित होते.
